मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील एका ३० वर्षीय माजी उपसरपंचाला गावातीलच चौघांनी अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या मारहाणीत माजी उपसरपंचाची दीड तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली असून, हल्लेखोरांनी त्याचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईलही जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. ही घटना काल, शुक्रवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास घडली.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी माजी उपसरपंच बबन सीताराम लोखंडे हे काल सकाळी आपल्या कामावर जात असताना रांजणस्टॉप येथील दत्तात्रय जतकर यांच्या किराणा दुकानासमोर पोहोचले.

यावेळी काकासाहेब मधुकर लोखंडे, बिरुदेव शिवाजी लोखंडे, युवराज भिवा लोखंडे आणि ज्ञानेश्वर शिवाजी लोखंडे या चौघांनी त्यांना दुचाकीवरून येऊन अडवले.
काकासाहेब लोखंडे आणि युवराज लोखंडे यांच्या हातात लोखंडी चेन होती, तर बिरुदेव लोखंडेच्या हातात केबल वायर होती. हल्लेखोरांनी बबन लोखंडे यांना शिवीगाळ करत “तू गावात भांडणे लावतोस का?” असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी बिरुदेवने केबलने, तर युवराज व काकासाहेब यांनी लोखंडी चेनने मारहाण करून जखमी केले.

मोबाईल लुटला, जिवे मारण्याची धमकी
मारहाणीदरम्यान, काकासाहेब लोखंडे याने बबन लोखंडे यांच्या खिशातील ‘Vivo Y7’ कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. या झटापटीत बबन यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन तुटून गहाळ झाली.

परिसरातील दत्तात्रय जतकर आणि कुमार व्हनमाने यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी “पुन्हा आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन तेथून पलायन केले.

पीडित बबन लोखंडे यांनी तात्काळ मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, वरील चौघांविरुद्ध मारहाण, लुटालूट आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













