टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून नव्याने शेती कर्ज देण्यासाठी ओटीएस योजनेला मुदतवाढ देण्यात येत असून जे शेतकरी थकबाकी भरणार नाहीत त्यांच्यावर
१०१ अन्वये आर. आर. सी. नुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
नोव्हेंबर २०२२ पासून डीसीसी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना सुरू केली. त्यामध्ये जिल्ह्यातील ३९७१ शेतकऱ्यांनी भाग घेतला.
मार्च महिन्यात ओटीएस योजनेची मुदत संपल्याने ४ मे रोजी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल, असे भोळे यांनी सांगितले. जे शेतकरी थकबाकी भरून योजनेचा फायदा घेणार नाहीत, योजनेकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर १०१ अन्वये वसुलीची कारवाई करण्यात येईल.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई, व्यवस्थापक रावसाहेब जाधव, विभाग प्रमुख संतोष वरपे आदी उपस्थित होते.
थकबाकी वसुलीवर भर..
■ बिगर शेती कर्जाची थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू आहेत. जे जे करता येईल ते करून बिगरशेती कर्जाची वसुली करण्यात येणार असल्याचे प्रशासक कुंदन भोळे ज्यांनी सांगितले.
मागील वर्षी १५२ कोटी तोटा असलेल्या डीसीसीला यावर्षी ३४ कोटी ७५ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याचे भोळे यांनी सांगितले. बँकेचा एनपीए मागील वर्षापेक्षा ८.५१ टक्क्याने कमी झाला असून २३.२९ टक्के एनपीए असल्याचे त्यांनी सांगितले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज