मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, दरम्यान याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन्ही पवार कधी एकत्र येणार?

असा थेट प्रश्न विचारण्यात आला, याला उत्तर देताना ते मला माहीत नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

दरम्यान दोन्ही पवार एकत्र कधी येणार? या प्रश्नला उत्तर देताना शरद पवार यांनी थेट एकत्र येणार किंवा एकत्र येणार नाही? याबाबत कोणतंही वक्तव्य न करता कधी एकत्र येणार ते मला माहिती नाही असं म्हटलं आहे,


त्यामुळे आता शरद पवार यांच्या या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.


नेमकं काय म्हणाले पवार?
‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न जसा तुम्हला पडला आहे, तसाच अनेकांना पडला आहे. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेलं नाही. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या,

आजपर्यंत ही फक्त चर्चा आहे, वरिष्ठ पातळीवर पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील यांनी याबाबतीत आम्हाला कुठेही काहीही सांगितलेलं नाही, जर आम्हाला काही कळालं तर आम्ही नक्कीच मीडियासमोर येऊन बोलू,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
दरम्यान यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब आणि अजितदादांची बोलणी सुरू आहेत असं म्हणतात. मात्र याबाबत सध्या भाकीत करणं उचित नाही,

परंतु काही दिवसांनंतर तुम्हाला याचं चित्र स्पष्ट होईल. शरद पवार साहेब पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला चाललो असं सांगतात. म्हणून ते जे बोलले मला माहिती नाही याचा अर्थ सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत, फक्त नेमकं कोणत्या वेळेला याचा मुहूर्त ते शोधत आहेत, असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















