टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या जीसीसी-टीबीसी (शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग) परीक्षा केंद्र उपलब्ध झालेले आहे.
महाराष्ट्र शासनाने मशिन टायपिंग ऐवजी नव्याने कॉम्प्युटर टायपिंग कोर्स 2015 पासून सुरु केलेला आहे.
एक हजार विद्यार्थ्याची परीक्षा दि.२५ जुलै ते २३ ऑगस्ट २०२२ अखेर होणार
शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा केंद्र मंगळवेढ्यात झाल्यामुळे मंगळवेढा शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे. या परीक्षा केंद्रात मंगळवेढा येथील प्रायमा कॉम्प्युटर, सरस्वती कॉम्प्युटर
तर पंढरपूर तालुक्यातील श्रध्दा कॉम्प्युटर, मंदिरा कॉम्प्युटर, भक्ती कॉम्प्युटर, सिलिकॉन कॉम्प्युटर, गजानन कॉम्प्युटर, दत्त कॉम्प्युटर अजोती या शासनमान्य संस्थेतील एक हजार विद्यार्थ्याची परीक्षा दि.२५ जुलै ते २३ ऑगस्ट २०२२ अखेर होणार आहेत.
प्रायमा कॉम्प्युटर इन्स्टिटयूटचे प्राचार्य नीलकंठ कुंभार बोलताना म्हणाले की, सदर परीक्षा केंद्र मंगळवेढ्यात सुरु करण्यासाठी विद्या विकास मंडळाचे व रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा,
श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी. पवार सर यांना परीक्षा केंद्र घेण्यासाठी विनंती केली.
मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या बाहेर जाऊन परीक्षा देण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते म्हणून ती अडचण निश्चितपणे श्री संत दामाजी महाविद्यालय दूर करेल असे राहूल शहा म्हणाले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी.पवार यांनी महाविद्यालयाचे संमत्तीपत्र तात्काळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस पाठवून देवून कॉम्प्युटर परीक्षा केंद्र मंजूरी घेतली. याकामी प्रा. नवनाथ जगताप व इतर कर्मचारी वर्गाचे सहाकार्य लाभले असे
मंगळवेढ्यात कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा केंद्र सुरु झाल्यामुळे विद्यार्थी वर्गानी समाधान व्यक्त केलेले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज