मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ प्रकरणातील त्या दोघा प्रेमी युगूलांना पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात उभे केले असताना न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने या दोघा प्रेमीयुगूलांना मंगळवेढा जेल मधून सोलापूर येथील कारागृहात वर्ग करण्यात आले असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
पाठखळ येथे दि.१४ जुलै रोजी यातील प्रेयसी किरण व प्रियकर निशांत या दोघांनी त्यांचे प्रेमप्रकरण उघड होवू नये या कारणास्तव रात्री २.३० वाजता एका वेडसर ६० वर्षीय महिलेस कडब्याच्या गंजीत जाळून मारले होते.
या घटनेमध्ये पोलीसांनी दोघाही आरोपींना अटक करुन न्यायालयात उभे केल्यानंतर दोन वेळा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
तपासादरम्यान आरोपी निशांत याने प्रेयसी किरण हिस मोटर सायकलवरुन कराडला जाण्यासाठी सांगोला मार्गे विटा हद्दीत सोडून कराड येथील त्याचा मित्र याला माझ्या आत्याची मुलगी असून तिला कराड येथे घेवून जा म्हंटल्यानंतर त्याने कराडला घेवून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीसांनी या दरम्यान गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त केली आहे. सदर वेडसर महिला ही गोपाळपूरची असून पोलीसांनी तिचा व्हिडीओ मिळवून खात्री केली आहे. मयताचे घरी असलेले डोकीचे केस तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
परवा पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सध्या मंगळवेढा कारागृह आरोपीने खचाखच भरले असून सुरक्षेच्या दृष्टीने त्या दोघा आरोपींना सोलापूर येथील कारागृहात ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्यामुळे तिकडे पाठविण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज