टीम मंगळवेढा टाईम्स ।
अन्नदान श्रेष्ठदान” या उक्ती प्रमाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. श्री मनोहर शामराव सावंजी यांचा ७ वा पुण्यस्मरण दिन मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह ,लवंगी ता.मंगळवेढा येथे अन्नदान करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री संदीप पवार सर म्हटले कि,आपला जन्मदिवस साजरा करण्यासाठी अनेक जण येथे येतात परंतु पुण्यस्मरण दिन आमच्या संस्थेतील बालकांसोबत साजरा करण्याचा सावंजी परिवाराचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
संस्थे विषयी माहिती सांगताना मा.अध्यक्ष श्री शिवाजी जाधव म्हटले की येथे ६ ते १८ वयोगटातील तब्बल ८० मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य सर्व स्टाफ प्रामाणिक पणे करत असतो.
हि सर्व मुले अनाथ व मतिमंद आहेत त्यांचे पालपोषण व शिक्षण आमच्या हातून घडले हे मी माझे भाग्य समजतो.तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांसाठी कृषी कार्यशाळा हि सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास श्रीमती सुमन सावंजी, सुशीला सावंजी, स्वाती सावंजी, छाया खटकळे, शिवाजी सावंजी, जनार्धन सावंजी, प्रताप सावंजी, सचिन सावंजी, विक्रम सावंजी, अंकूश सावंजी, सीताराम सावंजी,
धनाजी सावंजी, तानाजी सावंजी,संजय सावंजी, लहुराज जगताप,गणेश सावंजी,सुशील गवळी, गणेश सरकळे, प्रणित सावंजी, आबा गवळी, संचित सावंजी,पंपू कांबळे,
प्रचीती सावंजी, स्वरूप सावंजी इशिका सावंजी आदीजण उपस्थीत होते. संस्थेचे विशाल शेंद्रे सर यांनी मनोहर सावंजी यांच्या सामाजिक कार्याची परंपरा चालू ठेवल्या बद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज