mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर येथील चैत्रयात्रा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आ.प्रशांत परिचारक यांचा पाठपुरावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पंढरपूर येथील चैत्रयात्रा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आ.प्रशांत परिचारक यांचा पाठपुरावा



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसचे देशात तसेच राज्यातील अनेक जिल्हयात रुग्ण आढळून येत असून या  पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात भरणार्‍या पंढरपूर येथील चैत्री यात्रेबाबत शासनाची भूमिका काय हे स्पष्ट करावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ऐनवेळी यात्रा रद्द केल्यास याचा व्यापार्‍यांसह वारकरी भाविकांना देखील त्रास सहन करावा लागेल. यावर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची चैत्रयात्रा दि.4 एप्रिल 2020 रोजी संपन्न होणार आहे. परंतू सध्या  महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. या कोरोना व्हायरसचे संशयित रूग्ण पुणे,मुंबई, नागपूर, नाशिक, अहमदनगर,बीड या जिल्हयामध्ये  आढळून आलेेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातून तसेच ग्रामीण  व दुर्गम भागातून भाविक या यात्रेमध्ये  खूप मोठया प्रमाणात अंदाजे 4 ते 5 लाख भाविक यात्रेमध्ये सहभागी होत असतात.या यात्रेनिमित्त शासनामार्फत जादा बसेस,ट्रेन याची व्यवस्था केली जाते. तसेच या यात्रेसाठी पंढरपूर शहरातील व्यापारी हे विविध वस्तूंची व प्रसादाची विक्री मोठया प्रमाणात करतात. 

साधारणत वारीच्या अगोदर एक महिन्याचा कालावधी असताना व्यापारी माल तयार करीत असतात व विविध वस्तू खरेदी करत असतात. जर शासनाने ऐनवेळी यात्रा न भरण्याचा  आदेश काढला तर व्यापार्‍यांचे मोठया प्रमाणात  आर्थिक नुकसान होईल.त्यामुळे शासनाने याबाबत चेत्रयात्रेबाबत निर्णय घेण्याची मागणी आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.



तसेच वारकर्‍यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव वारीकाळात  खूप मोठया प्रमाणात  पंढरपूर शहरात इतर जिल्हयातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो. आरोग्याच्यादृष्टीनेही स्थानिक प्रशासनाकडून वारकरी भाविक व पेालिस प्रशासनाची काळजी घेतली जाते. त्यामुळे 4/4/2020 रोजी होणार्‍या चैत्र यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक  येणार असल्याने त्यांना कोरोना व्हायरसची लागण होवू नये  यासाठी यात्रा कालावधीमध्ये  कशा प्रकारे कोरोना व्हायरसचा सामना केला जाणार आहे याबाबत जनतेला आवाहन करावे. सध्या महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रामध्ये राज्यातील यात्रा व जत्रा रद्द केल्याचे वाचण्यात आलेले आहे.



 त्याधर्तीवर पंढरपूर येथील चैत्रवारी भरणार आहे किंवा नाही याबाबतचे लेखीपत्राव्दारे व अधिवेशनामध्ये विचारणा केली असता मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर उच्चस्तरीय बैठक घेवून निर्णय घेतला जाईल असे आश्वाासन दिले असल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.

 तसेच पंढरपूर येथील चैत्र यात्रा भरणेबाबत वारकरी सांप्रदायातील लोकांशी चर्चा व्हावी सदर यात्रेसाठी  महाराष्ट्राबरोबरच शेजारील कर्नाटक राज्यामधूनही अनेक भाविक या यात्रेसाठी  पंढरपूरमध्ये  येत असतात. त्या राज्यासही यात्रेबाबत निर्णय अवगत करावा. सदर यात्रा भरणार असेल तर  लवकरात लवकर तसे महाराष्ट्रातील व शेजारील कर्नाटक राज्यातील जनतेस आवाहन  करण्यात यावे अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केले.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

प्रा.आ.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने भैरवनाथ शुगर येथे १५१ जणांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 21, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा