टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोर पालन करावे, त्यांचे अनिवार्य उल्लंघन केल्यास उमेदवारांना कायमस्वरूपी वा ठरावीक कालावधीसाठी प्रतिरोधित (डिबार) केले जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.
आयोगाने उमेदवारांना परीक्षा केंद्रावरील उपस्थितीबाबत, ओळखीच्या पुराव्याबाबत, परीक्षेच्या यावेळी उमेदवारांनी सोबत कोणते साहित्य किंवा वस्तू बाळगाव्यात, पारंपरिक पेपरच्या वेळेस काय कार्यपद्धती वापरावी,
परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांनी काय कार्यवाही करावी, अशा विविध विषयांबाबत सखोल मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कार्बनलेस उत्तरपत्रिकांच्या वापराबाबत उमेदवारांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
उमेदवाराने वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी २५ टक्के किंवा २-४ गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाच्या सूचना
उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर किमान दीड तास आधी पोहोचणे
परीक्षेच्या वेळी आधार कार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत लेखनिकाची मदत व किया भरपाई वेळ घेता येणार नाही.
परीक्षेसंदर्भात आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाच्या सूचनांबाबत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना पाहणे उमेदवाराच्या हिताचे ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज