साठेनगर येथे चेअरमन समाधान आवताडे यांचेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मागील दोन महिण्यापासून रस्त्यावर उतरून चोख बंदोबस्त देणाऱ्या पोलीस अधिकारी,सेवा देणारे डॉक्टर,सफाई कामगार व पत्रकारांवर साठेनगर परिसरात नागरिकांनी पुष्पवृष्टीने स्वागत केले. पोलिस अधिकारी,सफाई कामगार व पत्रकारांचे मनोबल उंचावण्यासाठी नागरिकांकडून करण्यात आलेल्या या स्वागताने सर्वजण भाऊक झाले होते.
याप्रसंगी संत दामाजी कारखाना व राष्ट्रीय कामगार संघटना(इंटक) व चेअरमन समाधान आवताडे यांच्यावतीने साठेनगर मध्ये गरजू व गरीब ८५ पेक्षा कुटूंबाना धान्याचे किट वाटप करण्यात आले. यामध्ये साखर शेंगदाणे खाद्यतेल विविध डाळी यासह आवश्यक दैनंदिन वस्तूंचा समावेश होता.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,दामाजी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, पत्रकार समाधान फुगारे,माजी नगरसेवक खंडू खंदारे, प्रा.सिध्देश्वर अवघडे,माजी नगरसेवीका श्रीमती कलावती खंदारे,परमेश्वर पाटील,दादा बाबर,अक्षय शेवडे,अंकुश देवकुळे, ज्ञानेश्वर चव्हाण, लक्ष्मण अवघडे,दामाजी अवघडे, राजू कांबळे,योगेश अवघडे,दाजी कांबळे,अशोक खंदारे राहुल वाघमारे यासह सर्व उपस्थितांच्या हस्ते साठे नगर मधील 12 नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत वस्तूंचे वाटप केले.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋतिक खंदारे योगेश खंदारे दशरथ लोकरे समर्थ साखरे प्रवीण खंदारे अनिल खंदारे पवन अवघडे आदी तरुणांनी परिश्रम घेतले.
संबंध देशासह राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. स्वतःची, घरादाराची व कुटुंबियातील सदस्यांची तमा न बाळगता पोलिस कर्मचारी अधिकारी,डॉक्टर ,सफाई कामगार व पत्रकार हे सेवा देत आहेत.रखरखत्या व तळपत्या उन्हात घामाच्या धारा गाळत सेवा देत असलेल्या सर्वांचे मनोबल वाढविण्यासाठी नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.
पुष्पवृष्टीने निश्चितपणे आमचे मनोबल वाढले
प्रत्येक नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक नियमांचे तंतोतंत पालन करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरितीने पार पडल्यास निश्चितपणे आपण या संकटावर मात करू शकतो. असे सांगतानाच साठेनगर परीसरातील नागरिकांनी केलेल्या पुष्पवृष्टीने निश्चितपणे आमचे मनोबल वाढले आहे. आपण सर्वजण मिळून कोरोनाच्या संसर्गावर मात करू असा विश्वासही डॉ.प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केला.
———————-
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज