mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दरड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ‘हा’ हेल्पलाईन नंबर जारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 20, 2023
in राज्य
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने राज्यातील अनेक भागात नद्या, नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावातही पाणी शिरलं आहे.

त्यामुळे शेकडो नागरिकांचं स्थलांतर केलं आहे. पावसाने दाणादाण उडवल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. काल तर पावसामुळे मुंबई आणि ठाण्यात चांगलीच दाणादाण उडवली होती. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. लोकलसेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे घरी जाताना चांगलेच हाल झाले होते. आजही सकाळपासून अनेक भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

ठाकूरवाडी गाव दरडग्रस्तांच्या यादीतच नव्हतं, मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली; चौकशीचं आश्वासन

:खालापूर जिल्ह्यातील ठाकूरवाडी गावावर दरड कोसळल्याने या दुर्घटनेत पाच लोक दगावले आहेत. तसेच 34 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबल्याचं सांगितलं जात आहे.

तसेच तब्बल 100 लोक या दरडीखाली दबल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे गाव दोन डोंगरांच्यामध्ये आहे. तरीही या गावाचा दरडप्रवण गावांच्या यादीत समावेश करण्यात आला नसल्याचं उघड झालं आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

खालापूरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पण पावसामुळे अडथळे येत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि स्थानिक लोकांच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

चूक कुणाची नंतर पाहू

गिरीश महाजन, महेश बाल्दी घटनास्थळी आहे. डोंगरावर जाऊन ते पाहणी करत आहेत. आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच दरडग्रस्त गावांच्या यादीत या गावाचा समावेश नव्हता. ही चूक कुणाची ते नंतर पाहू. आधी मदतकार्य करण्यास प्राधान्य देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मदतकार्य वेगाने

इर्शाळवाडी येथे वेगाने मदतकार्य सुरू आहे. इथे 45 घरांची वस्ती आहे. दरड कोसळल्याने 15 ते 17 घरे दबली आहेत. पाऊस सुरू आहे. गाड्या जाऊ शकत नाहीत. जेसीबीही जाऊ शकत नाही. त्यामुळे मॅन्युअली काम सुरू आहे. जवान जीव लावून काम करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेल्पलाईन नंबर

8108195554

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दरड कोसळलीमदत केली

संबंधित बातम्या

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नॉन स्ट्राईकला आयुष्याचा झाला The End; रन काढताना हार्ट अटॅक आला, Live मॅचमध्ये रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा मृत्यू

February 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टेन्शन मुक्त! दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षेचे टेन्शन; एका कॉलवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेता येणार; बोर्डाने केली तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

February 9, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
Next Post

नागरिकांनो! तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला असेल तर घाबरुन जावू नका; वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..