टीम मंगळवेढा टाईम्स ।
युक्रेन व रशिया या दोन देशातील युध्दामुळे विमानसेवा ठप्प झाल्याने अडकून पडलेल्या मंगळवेढा तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांसह एकूण बारा विद्यार्थी आज रोमानियातून भारतात सकाळी 11 वाजेपर्यंत पोहचणार आहेत.
वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या तालुक्यातील दनिप्रो मेडिकल इंस्टिट्यूटमध्ये अभिजीत चव्हाण (आंधळगाव), प्रथमेश अनिल माने (दामाजीनगर), प्रथमेश शिवाजी कांबळे (ब्रम्हपुरी), रितेश बाजीराव गवळी (भालेवाडी), प्राजक्ता दादा भोसले (नागणेवाडी) यांनी प्रवेश घेतला होता.
यातील काही पहिल्या व काही तिसऱ्या वर्षाला शिकत आहेत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे त्या मुलांनी मायदेशी परत येण्यासाठी २७ फेब्रुवारीचे विमान तिकीट बूक केले.
परंतु युध्दामुळे विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांना तिथेच अडकून राहावे लागले. अडकलेल्या मुलांशी पालकांचा त्यांचा सातत्याने संपर्क होत असून मुलांनी देखील आपण सुखरूप असल्याचे पालकांना सांगितले.
युक्रेनमधून त्यांनी बाराशे किलोमीटरचा बस प्रवास व २ किलोमीटर चालत प्रवास करून रोमानियामध्ये प्रवेश केला.
त्या ठिकाणी सुरक्षित थांबून काल रात्री त्यांना विमान उपलब्ध झाले असून भारतीयप्रमाण वेळेनुसार हे विमान दिल्लीत सकाळी 11 वाजेपर्यंत पोहचणार आहे.
यात मंगळवेढ्यातील पाच विद्यार्थ्यांबरोबर सांगली, पंढरपूर, पुणे, मुंबई, सांगोला येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (स्रोत:सकाळ)
जिल्ह्यातील दोन विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये अडकलेले
सोलापूर शहर व जिल्ह्यातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्येच अडकले आहेत. त्यातील एक विद्यार्थी उत्तर सोलापूर तालुक्यातील तर एक विद्यार्थी पंढरपूर तालुक्यातील आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विद्यार्थी , पालक, सरकार यांच्यात सातत्याने समन्वय ठेवला जात आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज