टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याच्या ग्रामविकास खाते अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, हिवरगाव व लक्ष्मी दहिवडी या गावातील ब दर्जा प्राप्त देवस्थानांच्या भौतिक सुविधा विकासासाठी ५ कोटी ३३ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सदर विकासकामी निधी मंजूर होण्यासाठी आमदार आवताडे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामार्फत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
ब दर्जा प्राप्त वरील हिवरगाव येथील श्री कामसिद्ध देवस्थान या ठिकाणी पुरुष व स्त्रिया भाविकांसाठी यात्रीभक्त निवास बांधण्याच्या कामासाठी १ कोटी ४७ लाख तर वाहनतळ व शौचालय बांधण्यासाठी ५३ लाख रुपये
तर खोमनाळ येथील श्री कामसिद्ध देवस्थान येथे पुरुष व महिला भाविक भक्तांसाठी यात्री भक्तनिवास बांधण्यासाठी १ कोटी ४७ लाख व वाहनतळ शौचालय बांधण्यासाठी ५३ लाख रुपये,
त्याचबरोबर लक्ष्मी दहिवडी येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी येथील देवस्थान येथे तीर्थक्षेत्र विकास अनुषंगाने येणाऱ्या महिला यात्रेकरुंसाठी भक्तनिवास बांधणे ४५ लाख, रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी ३८ लाख, संरक्षक भिंत बांधणे २५ लाख व व मंदिर आवाराभोवती पेव्हिंग ब्लॉक व पाणीपुरवठा करणे २५ लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे.
काही महिन्यापूर्वीच राज्यामध्ये सत्तांतर होऊन सत्ता खांदेपालट झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आमदार आवताडे यांनी
पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाच्या धोरणात्मक विकासासाठी रस्ते, वीज, पाणी व आरोग्य या बाबींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे.
आमदार आवताडे यांची विकासात्मक दृष्टी या मतदारसंघातील जनतेच्या कृतिशील आणि व्यापक प्रगतीसाठी खूप मोठा माइलस्टोन ठरत आहे.
ग्रामीण तीर्थक्षेत्र ब दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांसाठी भौतिक सोयी-सुविधा अधिक गतिमान करण्यासाठी तसेच या देवस्थानाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी अतिशय उपयोगी ठरणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील अध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेची चौकट आणखी समृद्ध करण्यासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर व पंचायत समिती मंगळवेढा माजी उपसभापती पुत्र धनंजय पाटील यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून
वरील ब दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांना एवढा भरीव निधी मंजूर करणेकामी खूप मोठे सातत्य ठेवले होते. वास्तविक पाहता या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची गर्दी खूप मोठी असून सदर निधीमुळे येणाऱ्या भाविकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वरील गावातील सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव पातळीवरील समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय राहून जनतेची निस्वार्थ भावनेने सेवा करत असताना आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला एवढा निधी मंजूर घेऊन विविध गावांच्या व पर्यायाने एकूणात्मक मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय उराशी बाळगून विविध मार्गांनी निधीचा महापूर आणणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांचे तमाम सदर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तमाम ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.
आ.समाधान आवताडे यांच्यामार्फत मिळाला भरीव निधी
आमदार समाधान आवताडे यांच्या सार्वजनिक जीवनातील समाजकारण आणि राजकारण कारकीर्दपासून त्यांच्या कार्याविचारांशी निष्ठा कायम ठेवून त्यांना विविध स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी एकदिलाने आणि एकविचाराने साथ देणाऱ्या
हिवरगाव सारख्या छोट्याशा गावाला विधायक दृष्टिकोन बाळगून समाधान आवताडे यांच्यामार्फत मिळालेला हा भरीव निधी म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून गावपातळीवर नि:स्वार्थपणे जनतेच्या केलेल्या समर्पक सेवेची पोहोचपावती आहे.
आमच्या वडिलांपासून ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या राजकीय व्यक्तिमत्व उभारणीसाठी योगदान देणाऱ्या तमाम ग्रामस्थांच्या वतीने आमदार महोदय यांचे शतशः आभार – रवी खांडेकर, सरपंच, ग्रामपंचायत हिवरगाव
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज