टीम मंगळवेढा टाईम्स।
चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या गळितास येणाऱ्या उसाकरिता २५०१ रुपयेप्रमाणे हप्ता दिला जाणार असून, भविष्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत सगळ्या कारखान्यांबरोबर केन पेमेंट देण्याचे आमचे संचालक मंडळाचे धोरण आहे.
सभासद शेतकऱ्यांनी आपला – ऊस दामाजी कारखान्यास गळितास देण्याचे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले आहे.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ २४ या चालू गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन २ नोव्हेंबर रोजी कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, औदुंबर वाडदेकर, महादेव लुगडे, दादासाहेब दोलतडे, सरकोलीचे उद्योजक शेखर भोसले यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी चेअरमन पाटील म्हणाले, कारखान्यातील कामगार सभासद यांच्यामुळे कारखाना सुरळीत चालू झाला आहे. मागील हंगामात गळितास आलेल्या उसास जादा ५१ रुपयेप्रमाणे एफआरपीपेक्षा जास्तीचे बिल दोन दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
चालू गळीत हंगामा अखेर शेवटच्या टनापर्यंत गाळपास येणाऱ्या उसाला सदरचा हप्ता वेळेवर दिला जाणार असून तसे नियोजन आम्ही केलेले आहे. कामगारांचा एक महिन्याचा पगार व जाहीर केलेला बोनस ५ नोव्हेंबर रोजी दिला जाणार असून,
दीपावली सणासाठी सभासदांना प्रतिकिलो २० रुपये या सवलतीच्या दराने २५ किलो साखर सभासदांच्या सोयीनुसार तालुक्यातील विविध साखर विक्री केंद्रांवर ६ ते ९ नोव्हेंबर अखेर वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर पोती पूजनप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील,
गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज