समाधान फुगारे । सोलापूर येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अतिशय आवश्यक आहे.यासाठी जिल्हा प्रशासना ने नागरिकांना वारंवार विविध माध्यमातून आवाहन केले आहे. मास्क न वापरल्यास आर्थिक दंड करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. A fine of around Rs 44 lakh was levied for not wearing a mask in a public place solapur
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ४३ हजार प्रकरणात नागरिकांना दंड करण्यात आला असून त्यांच्याकडून ४४ लाख १ ९ हजार २६० रुपये आजपर्यंत वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
याबाबतच्या एकूण कारवाईत आतापर्यंत ८९ लाख १९ हजार ५६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे , वाहनावरुन मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास , निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरु ठेवणे , सोशल डिस्टन्सींग न पाळणे , सार्वजनिक ठिकाणी थुकणे , सार्वजनिक ठिकाणी पान ,तंबाखूचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक , तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. ६ जुलैपासून ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी ४०९७२ प्रकरणात ६५ लाख ५१ हजार ६०१ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सर्व तहसीलदार कार्यालयाने ११५६५ प्रकरणात १६ लाख ७ ९ हजार १०० रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून ५३३ ९ प्रकरणात ६ लाख ८८ हजार ८६० रुपयांचा दंड वसूल केला.
दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा , सोशल डिस्टन्सिंग पाळावे , वयस्कर लोकांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार करुन घ्यावेत , असे आवाहन केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज