mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अर्थसंकल्पानंतर जाणून घ्या काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त; एका क्लिकवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 1, 2021
in राज्य, शैक्षणिक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आज 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.केंद्र सरकारने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होणार आहे.

तसेच चप्पल आणि स्वदेशी कपडेही स्वस्त होणार असून मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, तांबे आणि इलेक्ट्रिक उपकरणे स्वस्त होणार आहेत.

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. कोरोनामुळे केंद्र सरकार अनेक गोष्टी महाग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र, आजच्या अर्थसंकल्पातून सीतारामन यांनी देशवासियांवर कोणताही भार येऊ दिला नाही. उलट देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या इम्पोर्ट ड्युटी 12.5 टक्के एवढी तर जीएसटी 3 टक्के एवढी आहे. खूप काळापासून सोन्याची इम्पोर्ट ड्युटी कमी करावी तसच जीएसटीतही सुधारणा करावी अशी मागणी व्यापारी करत होते.

त्याचा काहीसा परिणाम या अर्थसंकल्पात पाहायला मिळाला आहे. सीतारामन यांनी सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोने आणि चांदी स्वस्त होणार आहे.

कस्टम ड्युटी किती टक्के कमी होणार?

निर्मला सीतारामन यांनी सोने, चांदी आणि तांब्यावरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होणार आहे.

या गोष्टी स्वस्त होणार

सोने, चांदी, तांब्याच्या वस्तू, स्वदेशी कपडे, चप्पल, नायलॉनचे कपडे, स्टील उपकरणे.

या वस्तू महागणार

मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, ठरावीक ऑटोपार्ट्स.

जुन्या कर प्रकरणातील तपासासाठी ६ ऐवजी ३ वर्षाचे रेकॉर्ड तपासणार

▪️ ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न भरायची गरज नाही

▪️ डिव्हिडन्टमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच्या करात कपात करणार

▪️गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय

▪️ टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरून १० कोटींवर

▪️एनआरआय नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून मुभा देण्याचा निर्णय

▪️पीएफ उशिराने भरल्यास कोणताही दंड आकारण्यात येणार नाही

▪️स्वस्त घरांसाठी कर्ज सवलतीमध्ये १ वर्षाने वाढ

▪️ कोविड-१९च्या काळातही देशभरात केंद्राने इंधनाचा सर्वाधिक पुरवठा केला असून उज्ज्वला योजनेचाही विस्तार केला जाणार आहे.

▪️भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘राष्ट्रीय रेल्वे योजना २०३०’ राबवण्यात येणार आहे.

▪️ २०२१-२२ दरम्यान कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून गरज पडल्यास आणखी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. आरोग्य सेवेसाठी २ कोटी २३ लाख ८४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, जी १३७ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.

▪️यंदाच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बस वाहतूक सेवा वाढवण्यासाठी १८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

▪️ गतवर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या भांडवल खर्चात ३४.५४ % इतकी वाढ पाहायला मिळाली आहे.

▪️ देशातील २७ शहरांमध्ये १०१६ किमी मेट्रोचे आणि आरआरटीएसचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

▪️ वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेमुळे ६९ कोटी लाभार्थ्यांना लाभ झाला असून उर्वरित ४ राज्य आणि केंद्रशासित राज्यांमध्ये पुढील महिन्यात ही योजना लागू करण्यात येईल.

▪️ पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलिगुडी राष्ट्रीय महामार्गाची घोषणा

▪️ १६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट

▪️ १०० नवीन सैनिक स्कूलची घोषणा

▪️ १ हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रणेशी जोडणार

▪️असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल निर्माण करणार

▪️सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न

▪️आदिवासी भागात ७५० ‘एकलव्य’ शाळा उभारणार

▪️पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी ६४ हजार कोटींची तरतूद

▪️लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूद

▪️गगनयान मिशन डिसेंबर महिन्यात सुरु करणार

▪️५ वर्षात सागर मिशन अंतर्गत अभूतपूर्व संशोधनाचं लक्ष्य

ADVERTISEMENT

▪️ डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद

▪️समुद्र संशोधन करण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद

▪️ देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये जल जीवन मिशन राबवण्यात येणार असून या महत्त्वकांक्षी योजनेसाठी २.८७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

▪️ यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेचे बजेट वाढवण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थानिक मोहिमा देशभरात राबवल्या जाणार आहेत.

▪️अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती

▪️सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज
८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना

▪️उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १ कोटीने वाढवणार

▪️लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद

▪️लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणीची घोषणा

▪️देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती, त्यासाठी कायद्यात सुधारणा करणार

▪️ सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीने स्किल ट्रेनिगवर काम सुरु

▪️३ वर्षात ५ लाख कोटींचा निधी उभारण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटशन

▪️यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी १,१८,१०१ कोटींची तरतूद करण्यात आली असून ही आजपर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे.

▪️३ वर्षात ५ लाख कोटींचा निधी उभारण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटशनची स्थापना करणार

*बजेट 2021 च्या आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी*

• नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद

• प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणीसाठी तरतूद

• १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा

• आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींच्या निधीची तरतूद

• कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

• १५ वर्षे जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’

• देशभरात ७ मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार

• कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी

• डीएफआयसाठी ३ वर्षांकरिता ५ लाख कोटींच्या निधीची तरतूद

• दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाईनचा विस्तार करणार

• कापड उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या ३ वर्षात ७ टेक्स्टाईल पार्कची निर्मिती

• रस्ते विभागासाठी १ लाख १८ हजार कोटींचा निधी

• मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

• २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर

• २०३० पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार

• या वर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार

• बीपीसीएल,एअर इंडिया, पवनहंस, आयडीबीआयची निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करणार

• मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीमधून १ लाख ७५ हजार कोटींचा निधी उभारणार

• शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट

• गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद

• गरज पडल्यास सरकार कोरोना लसीकरणासाठी आणखी निधी मंजूर करणार

• सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी

• नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा
नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद

• विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ वरून ७४ टक्क्यांवर

• सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अर्थमंत्री निर्मला सीतारामनअर्थसंकल्प

संबंधित बातम्या

संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मंगळवेढ्यात शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस आज धूमधडाक्‍यात साजरा होणार; सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

May 18, 2022
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

May 18, 2022
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

धुसपूस वाढली! काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

May 16, 2022
शिष्टाईला यश! सिद्धेश्वर आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले असे काही…; घालून दिला नवा आदर्श

शिष्टाईला यश! सिद्धेश्वर आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले असे काही…; घालून दिला नवा आदर्श

May 16, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभाजीनगर, बाबरी, राणा, हनुमान चालिसा ते मुंबईचा अन् महाराष्ट्राचा बाप फक्त.. देवेंद्र फडणवीसांचं भाषण ‘या’ मुद्यांमध्ये

May 15, 2022
तुका म्हणे पवारा; नको उडवू तोंडाचा फवारा..! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

तुका म्हणे पवारा; नको उडवू तोंडाचा फवारा..! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

May 14, 2022
Next Post
Government Job! सरकारी नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती; असा करा अर्ज

Job update! पदवीधर असाल तर तुमच्यासाठी मंगळवेढ्यात आहे नोकरीची संधी

ताज्या बातम्या

संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा