टीम मंगळवेढा टाईम्स । तुमच्या आंदोलनाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे काढलेल्या कर्जाचे हप्ते लोक भरत नाहीत. असे आंदोलन पुन्हा केले तर तुम्हाला जिवे मारण्यात येईल, अशी धमकी बहुजन सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप परकाळे यांना फोनवरून दिल्याप्रकरणी वाया फायनान्सच्या दोघा प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप परकाळे यांना वाया मायक्रो फायनान्सचे दोन प्रतिनिधी अविनाश विलास खुळे (रा. पाटकळ) व लक्ष्मण वाघमोडे (रा. मंगळवेढा) यांनी बहुजन सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली.
सध्या शहर व ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय व मोठ्या सहकारी बॅंकांच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध केले जात नसल्यामुळे ग्रामीण भागात महिलांनी खासगी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले.
त्या कर्जाच्या वसुलीसाठी प्रत्येक आठवड्याला त्यांचे प्रतिनिधी त्या कर्जदाराच्या घरोघरी जात आहेत. परंतु कोरोनाच्या संकटात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे हे सर्व छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. ते घेतलेल्या कर्जाचे भरू शकत नाहीत.
घेतलेले कर्ज व व्याज माफ करण्यासंदर्भात बहुजन सत्यशोधक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते. या आंदोलनाच्या बातम्या व व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यामुळे मायक्रो फायनान्सचे प्रतिनिधी वसुलीसाठी गेल्यावर कर्जदार महिलांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरले जात नसल्यामुळे हे फायनान्सचे प्रतिनिधी संतप्त झाले.
परिणामी त्यांची मजल मायक्रो फायनान्सचे व्याज व कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या प्रदीप परकाळे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत गेली. त्यामुळे मायक्रो फायनान्सची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे.(सकाळ)
Mujori of finance company! Social worker threatened to kill on mangalwedha
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज