टीम मंगळवेढा टाईम्स।
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला.
या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत असून, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे.
सध्या सर्वत्र या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान मंगळवेढ्यातील जाधव जलधाराचे मालक व बावची गावचे उपसरपंच दत्तात्रय जाधव यांनी बावची गावात मोफत चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार दि.9 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता जिल्हा परिषद शाळा बावची येथे गावातील व परिसरातील नागरिकांना मोफत सिनेमा पाहता येणार आहे.
उपसरपंच दत्तात्रय जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्रातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी; यासाठी छावा सिनेमा गावातील नागरिकांना मोफत दाखविण्याचा संकल्प केला आहे.
उपसरपंच जाधव म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे.
त्यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे बावची गावातील नागरिकांना छावा सिनेमा मोफत दाखविण्याचा प्रयत्न आहे.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज