मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी असताना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासबंदीचा भंग व तोंडास मास्क न लावता दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा-टेंशन वाढले : सोलापुरातील 10 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
-CoronaVirus : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार रावडे
यात राजस्थान येथील 38, पंढरपूर व चडचण येथील प्रत्येकी एक अशा 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत फिर्याद पोलिस उपनिरीक्षक सचिन खटके यांनी दिली असून यात कर्नाटकातून राजस्थानकडे जाण्यासाठी ट्रिपल सीट निघालेल्या तरुणांना बोराळे नाका येथे पोलिसांनी रोखून 25 जणांवर कारवाई केली.
यात मुकेश चौधरी (वय 28), महेंद्र देवासी (वय 18), गणपत पुरोहित (वय 29), भरत परीदावत (वय 18), दिनेश चौधरी (वय 21), शंकर चौधरी (वय 21), अर्जुन रामबेल (वय 30), निंबाराम चौधरी (वय 28), रमेश चौधरी (वय 20), भिकाराम चौधरी (वय 27), महेंद्रकुमार चौधरी (वय 23), सोहाराम चौधरी (वय 26), सोनाराम चौधरी (वय 29), दाक्ताराम चौधरी (वय 18), रत्नाराम देवासी (वय 17), हरिराम देवासी (वय 37), राजूराम देवाशी (वय 23), पुरण कुमार देवाशी (वय 25), डूगराम देवासी (वय 21), भगवान राम देवाशी (वय 31), मुकेश माळी (वय 22), परसराम देवासी (वय 25), ओम प्रकाश देवासी (वय 24), कालूराम कच्छवा (वय 25), जितेंद्र देवासी (वय 20) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत माली भरतकुमार (वय 25), मानप राम (वय 25), नारायणलाल सावरी (वय 20), भैरूलाल सावरी (वय 32), भैरू मोहन सावरी (वय 36), शेषराज बलाई (वय 26), भोजराज सालवी (वय 24), नारायण रोशन लालबिल (वय 30), दिनेश बिजराम बिल (वय 18), रामप्रताप साकेत (वय 21), कली प्रेमलाल सावंत (वय 23), हरिलाल साकीत, नागनाथ भरती (वय 28), अजित मारुती भोसले (वय 30, सध्या कोल्हापूर, मूळ गाव सरकोली), शिवानंद जानुमराम दशवंत (वय 35) हे सर्व 15 जण शहरालगत असलेल्या पंढरपूर रोड बायपासजवळ आढळले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वांना बालाजीनगर आश्रमशाळा येथे ठेवले आहे. तपास सहायक पोलिस संजय राऊत करत आहेत.
———–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज