टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा येथील गट नंबर १२६ व १२७ मधील ग्रामपंचायतच्या समाज मंदिरात बालाजी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था बालाजीनगर ही पतसंस्था चालवत आहेत.
गेली अनेक वर्ष समाज मंदिरात पतसंस्था चालवत असल्यामुळे गावातील लोकांनाही समाज मंदिराचा लाभ घेता आला नाही या विरोधात गावातील नागरिक बोलू शकत नव्हते. त्यामुळे प्रहार संघटनेने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायतला हे संस्थाचालकांनी कोणताही कर भरलेला नाही व महसूलचा महसूल बुडवला आहे, त्यांच्या ऑडिटमध्ये भाडे दाखवले आहे. त्यामुळे ते भाडे कोणाच्या खिशात जाते हेही गावातील नागरिकांना समजणे गरजेचे आहे.
सध्या गावातील गाव पुढाऱ्यांना कर्ज दिले जाते पण गरिबांना दिले जात नाही हा अन्याय होत आहे. त्यामुळे प्रहार संघटनेने गट विकास अधिकारी हे यांना निवेदन दिले आहे पण मंगळवेढा पंचायत समितीचे अधिकारी त्यांच्यावरही राजकीय दबाव आणून शांत बसवले आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीचा महसूल बुडत असल्यामुळे गावकऱ्यांना खिशाला झळ लागत आहे. एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांना कर भरण्यासाठी तगादा लावला जातो, विद्यार्थ्यांचे दाखले अडवले जातात आणि या संस्थाचालकाकडे का बघितले जात नाही असाही प्रश्न पडत आहे.
जिथे अन्याय तिथे प्रहार शेतकऱ्यांचे दैवत बच्चू कडू यांचे ब्रीदवाक्य घेऊन लमाणतांड्याच्या नागरिकांना मदतीला प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजय राठोड व गावातील इतर प्रहार सैनिक हजर राहत आहेत.
त्यामुळे आता ही पतसंस्था आतापर्यंत कर भरत नव्हती त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार जरी गटविकास अधिकाऱ्यांना राजकीय दबाव आणला तरी प्रहार गुन्हा दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही.
या पतसंस्थेच्या चेअरमन व संचालक मंडळावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा सुरू ठेवणार आहे. हे आंदोलन उपविभागीय कार्यालयासमोर करु असे प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज