मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या फुलबॉल खेळाडूंच्या फॅन्समध्ये मारामारी झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र क्रिकेटच्या फॅन्समध्ये मारामारी झाल्याचं कदाचित ऐकलं नसेल. पण महाराष्ट्रात हा प्रकार घडलाय तो ही रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीच्या फॅन्समध्ये. Fight between Rohit Sharma and Dhoni’s fans in Kolhapur
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्या फॅन्समध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूरातील कुंदनवाडी याठिकाणी ही घटना घडलीये. 15 ऑगस्ट रोजी धोनीने जाहीर केलेल्या निवृत्तीनंतर त्याच्या फॅन्सी सर्वत्र पोस्टर लावले होते. त्यानंतर रोहित शर्माला खेलरत्न जाहीर झाल्यानंतर रोहितच्याही फॅन्सनी रोहितचे पोस्टर लावले. रोहितचे पोस्टर काही जणांनी काढल्यानंतर त्याचे फॅन्स रागावले.
यानंतर दोन्ही खेळांडूंच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी रोहित शर्माच्या एका फॅनने धोनीच्या फॅनला शिवीगाळ केल्यामुळे प्रकरण आणखी चिघळलं. त्यानंतर यांच्यात मारामारी सुरु झाली.
तर या प्रकरणाबाबत भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने भाष्य केलं आहे. सेहवाग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो,खेळाडू हे संघापुरते एकत्र असतात. काही खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांशी बोलतंही नाहीत. ते आपल्या कामाशी काम ठेवतात. पण काही फॅन्सतर वेड्यासारखे वागतात. कोणीही अशी मारामारी करू नका. कारण भारतीय संघ एक आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज