टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षासाठी आक्रमक आंदोलन करणारे मनोज जरांगे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मनोज जरांगे यांना लोकसभेसाठी उमेद्वारी मिळावी यासाठी फिल्डींग लावली जात आहे.
महाराष्ट्रातील या बड्या नेत्याने मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव दिला आहे. जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. वंचित वहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशातच आता वंचितने मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे असा प्रस्तावच महाविका आघाडीला दिला आहे.
महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये होत आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट या तिघांची जागावाटपावर चर्चा होणार आहे.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चार प्रतिनिधी उपस्थित आहेत. याआधी 27 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत पक्षाच्या वतीने वंचितचे राज्य उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.
नागपुरातील रामटेक लोकसभा जागेवर वंचित बहुजन आघाडीनं दावा केलाय. 1 मार्चला रामटेकमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा होणारेय. यातून वंचित भव्य शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. याच जागेसाठी महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडून आणि उद्धव ठाकरे गटाकडून दावा केला जात असताना आता वंचितनं देखील दावा केलाय.
वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसतांना वंचित बहुजन आघाडीने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी दिलीय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज