मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लाडकी बहीण योजनेत आता केवायसीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता लाभार्थी महिला ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात. दरम्यान, यासाठी वडील किंवा पतीची केवायसी करणे अनिवार्य आहे.

मात्र, ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांनी काय करायचे असा प्रश्न विचारला जात होता. आता त्यांच्यासाठी नवीन केवायसी प्रोसेस सुरु केली आहे.

लाडक्या बहिणींसाठी नवीन केवायसी प्रोसेस

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी केवायसी प्रोसेसमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता महिलांना वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे.

त्यानंतर वडील किंवा पतीचे मृत्यूपत्र, घटस्फोटीत महिलांचे कागदपत्र संबंधित विभागातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे. त्यानंतर सरकार महिलांच्या कागदपत्रांची शहानिशा करेल. यानंतरच लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, यासाठीची प्रोसेस जाणून घ्या.
वडील-पती हयात नाही अशा महिलांसाठी केवायसी प्रोसेस
सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जायचे आहे.
यानंतर केवायसी ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर महिलांचा त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. आधारशी लिंक नंबरवर ओटीपी येईल तो टाकायचा आहे. यानंतर तुमची स्वतः ची केवायसी पूर्ण होईल.

यानंतर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने जाऊन काही कागदपत्रे सबमिट करायची आहे. पती किंवा वडीलांचे मृत्यूपत्र, घटस्फोटित महिलांचे घटस्फोटाचे कागदपत्र महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













