मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । तुझा मुलगा आमच्या भावकीतील मुलीला का भेटायला येतो ? त्याचे प्रेमसंबंध अजून आहेत, या कारणावरून शिवीगाळ करत सीताराम गोपाळ वेताळ (वय ४२ , रा. बरडे मळा , भेंड, ता .माढा) याला सुहास बंडू साळुके व अविनाथ रामभाऊ साळुके (रा.भेंड) यांनी लाथा – बुक्क्या व लोखंडी पाइपने मारहाण केली. Father beaten over son’s love affair madha solapur
तसेच तो राहत असलेल्या छपराचे घर पेटवल्याची घटना भेंड ( ता . माढा ) येथे सोमवारी सकाळी घडली आहे.
याप्रकरणी दोघांविरुद्ध कुर्दुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज