मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
खरीप हंगामात जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. या योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी एका रुपयात पीकविमा भरता येणार आहे. अतिरिक्त पैसे मागणाऱ्यांची थेट तक्रार करा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले. पीकविमा योजनेच्या माध्यमातून तरी नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा असते. यासाठी शेतकरी आणि केंद्र राज्य सरकार हा हिस्सा भरून पीकविमा काढण्यात येतो.
दरम्यान, यंदाही योजना राबविण्यात येत असून, अधिसूचित पिके खरीप ज्वारी, तूर, उडीद, मूग, सोयाबीन संपूर्ण तालुका व सर्व महसूल मंडळांसाठी ही योजना लागू आहे.
असे मिळेल संरक्षण
नैसर्गिक आग, वीज कोसळणे. गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान या बाबींचा समावेश आहे. जोखीम स्तर (७० टक्के) असा आहे.
पीकविमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रतिअर्ज ४० रुपये देण्यात येतात. त्यामुळे शेतकयांनी केवळ एकच रुपया द्यावा, अतिरिक्त पैसे मागणाऱ्या केंद्र चालकांची लेखी तक्रार करावी. -शिवानंद पाटील, चेअरमन, दामाजी साखर कारखाना
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज