टीम मंगळवेढा टाईम्स।
कृषि उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेने मंगळवार दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी मुख्य बाजार आवारामध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.
मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतक-यांचे हित डोळ्यासमोर समोर ठेउन कामकाज करीत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील शेतक-यांसाठी नवीनच डाळींब व लिंबु सौदे लिलाव सुरू केलेले आहेत.
शेतक-यांच्या शेतमालाला दर जास्तीत जास्त कसा मिळेल याचा विचार करुन केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत आँनलाईन सौदे लिलावाचा प्रारंभ बाजार समिती संचालक मंडळाने सुरू केला आहे.
सदरच्या सौदे लिलावामुळे स्थानिक खरेदी व्यापा-याबरोबर राज्यातील व देशातील अन्य ठिकाणाहून देखील खरेदीदार मागणी करू शकणार आहेत त्यामुळे शेतक-यांना जास्तीचा दर मिळेणेस मदत होणार आहे.
कृषि पणन योजना याची माहिती दिली जाणार
शेतकरी मेळावामध्ये तालुक्यातील शेतक-यांना शासनाच्या शेतक-यांसाठी असलेल्या योजनांसह राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम), देशामध्ये नवीन १० हजार ए.फी.ओ., स्थापनेचा लक्ष्यांक, आणि कृषि पणन योजना याची माहिती दिली जाणार आहे.
तरी शेतक-यांनी मेळावा साठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सभापती सोमनाथ आवताडे यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज