टीम मंगळवेढा टाइम्स ।
ग्रामीण महिलाही शेती व शेती पूरक व्यवसाय यशस्वीरित्या करत आहेत. शेतीतील अनेक कष्टांची कामे महिलाच करतात. त्यांच्या शेतीतील काबाटकष्ट कमी करण्यासाठी उद्योजक जनार्धन शिवशरण यांच्या संकल्पनेतून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आदित्य इरिगेटर्स बेगमपूर व फिनोलेक्स पाईप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने आज सकाळी 11 वाजता कर्तबगार महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती फिनोलेक्स पाईपचे गोपाळ आदोने व आदित्य इरिगेटर्सचे संचालक तथा मेळाव्याचे संयोजक जनार्दन शिवशरण यांनी दिली.
या महिला मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे उद्घाटन कुरुल जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शैलाताई गोडसे यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.अंजली समाधान आवताडे या उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास पुणे येथील फिनोलेक्स पाईपचे विक्री व्यवस्थापक विश्वजीत हारूगडे,फिनोलेक्स पाईप पुण्याचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक संजय अळीकट्टे हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.
तरी सर्वांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान फिनोलेक्स पाईपचे गोपाळ आदोने व आदित्य इरिगेटर्सचे जनार्दन शिवशरण यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज