मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे, तर कुठं पावसानं उघडीप दिली आहे. काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
तसचे धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील 4 दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
राज्यभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता हलक्या थेंबेपासून ते मुसळधार पावसापर्यंत असणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या भागात कधी पाऊस पडणार आहे.
दरम्यान, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
पूर्व विदर्भ:
पूव्र विदर्भातील 12 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. (वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नांदेड) या जिल्ह्यांमध्ये 24 ते 26 ते 27 जुलैपर्यंत पाऊस अपेक्षित आहे.
पश्चिम विदर्भ:
पश्चिम विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशीम या 5 जिल्ह्यांमध्ये 24 ते 27 जुलैपर्यंत सतत पाऊस पडेल.
मराठवाडा:
नांदेड: 4 दिवस (२24 ते 27 जुलै) पाऊस.
परभणी: 24 जुलै दुपारपासून 27 जुलैपर्यंत जोरदार पाऊस.
लातूर व धुळे: 24 ते 27 जुलै दरम्यान सतत पाऊस.
बीड, जालना, संभाजीनगर: या जिल्ह्यांमध्ये 24 ते 27 जुलै दरम्यान पावसाची नोंद होईल.
अहिल्यानगर :
24 जुलै दुपारपासून 28 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे.
पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र:
24 ते 27 जुलै दरम्यान खंडित पाऊस पडेल.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, पारोळा, यवल, चाळीसगाव या जिल्ह्यांमध्ये 24 जुलैपासून पावसाची तीव्रता वाढेल. 26 व 27 जुलै रोजी पिकांसाठी चांगला पाऊस पडेल.
खान्देश जळगाव व घाट भाग
24 ते 27 जुलै दरम्यान चांगला पाऊस अपेक्षित आहे.
पावसानंतरचा अंदाज:
28 जुलै नंतर पावसाची तीव्रता कमी होईल.
29 जुलै रोजी पूर्व व पश्चिम विदर्भात चांगली सूर्यप्रकाशी अपेक्षित आहे.
28 जुलैनंतर पावसाला विराम येऊन, पुढील पाऊस ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे.
दरम्यान, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली होती. विशेषत: मराठवाड्यामध्ये. मात्र, आज पुन्हा एकदा पंजाबराव डखांनी पावसाची अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज