टीम मंगळवेढा टाईम्स।
जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्री घोटाळ्यात मुख्य भागधारक अजित पवारांच कुटुंब आहे. असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे, याप्रकरणी त्यांनी पत्रकार परिषद घेत पवारांच्या कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
“सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा झाला आहे. या कारखान्याचे मालक विजया पाटील, निता पाटील आणि मोहन पाटील आहेत. पवारांच्या बहिणींच्या नावे बेनामी मालमत्ता आहे. तसेच अजित पवार यांनी सर्व नियमांचे उल्लंघन केलं आहे.” असा ही दावा यावेळी सोमय्या यांनी केलाय
“या कारखान्यामध्ये ९०.५% शेअर्स प्राटिंग सोल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आहे. या कंपनीच्या मालक अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच नामी-बेनामी संपत्ती अशा एकूण ५७ कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचू शकली आहे.” असा खुलासाही त्यांनी केला.
तसेच, “हिंदुस्थानातील सगळ्यात मोठी इन्कम टॅक्सची रेड अजित पवारांवर करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स चोवीस पेक्षा जास्त कंपन्यांनपर्यंत पोचली आहे. ठाकरे-पवार घोटाळेबाज सरकार, या घोटाळेबाज सरकरकरला मुक्त करणं गरजेचं आहे.” असं देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज