मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्य सरकारची सुपरहिट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. या योजनेच्या नावानं काही बनावट वेबसाईट्स आणि फेक लिंक्स सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
या लिंक्सवर क्लिक करून आधार क्रमांक मागवला जात असून, त्यामुळे डेटा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झाले नाही. त्यामुळे काही जण चुकीच्या फेक लिंक्सला बळी पडतात.
आपण पात्र आहोत की नाही, हे तपासण्यासाठी काही लिंक्स शेअर होत आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थींनी अशा अफवांपासून सावध राहावं आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ नये.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रूपये जमा होतात. या योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
मात्र, तपास केल्यानंतर पुरुष आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे सरकारने योजनेची छाननी करत २६.३४ लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळेच जून महिन्यात त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली नाही.
अपात्र लाभार्थी महिलांची यादी तपासता येत नाही
काही महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिला फेक लिंक्सला बळी पडतात. पण वेबसाईटवर अपात्र महिलांची यादी तपासण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
पात्र महिलांच्या संबंधित वैयक्तिक माहिती आपल्याला मिळेल. पण पात्र नाही. तसेच कोणत्या महिन्याचा हप्ता खात्यावर जमा झाला, हे देखील पाहता येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज