टीम मंगळवेढा टाईम्स।
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ब्रेक लावलेल्या जलयुक्त शिवार योजनेची घोषणा पुन्हा एकदा करण्यात आली आहे.
आता सोलापूर जिल्ह्यातील एकूण 166 गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे सुरू केली जाणार आहे.
जलयुक्त शिवार अभियान 1 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील 166 गावांत जलयुक्त शिवार अभियान २.० हे अभियान राबविण्यात येणार आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
तालुकास्तरीय समितीने शिफारस केलेल्या १६६ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना टप्पा २ राबवण्यात येणार असून, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या
१७५ गावांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उर्वरित ९ गावांच्या निवडीबाबत तालुकास्तरीय समितीने फेरतपासणी करून गावांची यादी तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
जलयुक्त शिवार टप्पा २ च्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम. जे. शेख,
जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि. प.) पी. बी. भोसले, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यो. दामा यांच्यासह जिल्ह्यातील विविध उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील एकूण १ हजार १५७ गावांपैकी ९३३ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना टप्पा १ अंतर्गत कामे झाली असून ती जलपरिपूर्ण असल्याचे कृषि विभागाच्या अहवालावरून निदर्शनास आले आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी २२४ गावे निवडीसाठी शिल्लक होती. तालुकास्तरीय समितीच्या बैठका संपन्न होऊन २२४ पैकी १६६ गावांची टप्पा २ साठी शिफारस करण्यात आली.
गावांच्या निवडीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १६६ गावांची निवड अंतिम करण्यात आली. बाळासाहेब शिंदे आणि द. यो. दामा यांनी अनुषंगिक माहिती सादर केली.
तालुकास्तरीय समितीने शिफारस केलेल्या १६६ गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे
अक्कलकोट, ११, बार्शी – १, करमाळा ३, माढा ८, माळशिरस ७०, मंगळवेढा ०, मोहोळ २५, पंढरपूर ४७, सांगोला ०, उत्तर सोलापूर ०, दक्षिण सोलापूर १, एकूण १६६
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज