टीम मंगळवेढा टाईम्स ।
शालेय शिक्षण विभागाने दिव्यांग व एनएमएमएस शिष्यवृत्तीच्या अर्जाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती योजना विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत होती. ती वाढवली आहे.
शाळा स्तर पडताळणीची १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती, तीही १५ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. जिल्हास्तर पडताळणीची ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आता ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचे कोणी राहिले असल्यास अर्ज भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी तातडीने आपला अर्ज सादर करावा.
गुणांसाठी सीबीएसइची नियमावली
माध्यमिक शिक्षण केंद्रीय बोर्डाच्या (सीबीएसइ) इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणपत्रकात टक्केवारीचा उल्लेख नसतो. परंतु विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांकडून बोर्डाकडे मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर बोर्डाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गुणांची टक्केवारी काढण्यासाठीचे मार्गदर्शक तत्त्व आणि नियमावली जाहीर केली आहे. संबधित शाळा, महाविद्यालय किंवा इच्छुक संस्था या नियमांनुसार विद्यार्थ्यांची टक्केवारी काढू
शकणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोडनि दिलेल्या नियम- निर्देशानुसार विद्यार्थ्यांना किमान पाचपेक्षा अधिक विषयांसह परीक्षा दिली असल्याने सर्वोत्तम पाच विषयांतील गुणांच्या आधारे टक्केवारी काढता येईल.
सीबीएसई बोडनि म्हटले आहे की, परीक्षेच्या नियमानुसार टक्केवारी काढता येत नाही. तर ५ विषयांपेक्षा अधिक विषयांसह परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ५ विषयांतील टक्केवारी ग्राह्य धरण्याचा निर्णय प्रवेश देणारी संस्था घेऊ शकेल. ही सुविधा विद्यार्थी-पालकांच् या आग्रहास्तव देण्यात आल्याचेही बोडनि स्पष्ट केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज