मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. दर महिन्याला या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात राज्य सरकारकडून 1500 रुपये दिले जातात.
मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाहीत.
त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या 1500 रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत असून मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलं आहे.
एप्रिल महिना संपण्यासाठी आता अवघे आठ दिवस शिल्लक असून 30 एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची तपासणी सुरु असून,
योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. योजनेच्या निकषांनुसार ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.50 लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून 9 लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी विधानसभा निवडणूक संपल्यावर सुरु करण्यात आली. यात ज्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत तसेच ज्या सरकारी नोकरी करत आहेत अशांची पडताळणी करून त्यांना योजनेतून वगळण्यात आलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज