टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरालगत एमआयडीसी परिसरामधून निष्पाप बालक रणवीर कुमार साहू याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याने गेल्या नऊ दिवसापासून त्या मुलाच्या आई वडिलांची अवस्था बिकट झालेली आहे.
पोलीस यंत्रणेत तात्काळ या मुलाला शोधून काढावे व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज रविवार दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता
दामाजी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दिले आहे.
गुंड, भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची नाव काढून त्यांना ताब्यात घेऊन त्वरित त्या सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी करावी,
केंद्र व राज्य शासनाची यंत्रणा वापरून त्या बालकाचा जीव वाचवावा व भविष्यात इतर कोणत्याही निष्पाप बाळाला असे पळवून नेण्याचे धाडस कोण करणार नाही,
अशा प्रकारची शिक्षा द्यावी आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
भीमा नदीच्या पात्रात शोध घेऊनही बालक सापडेना
होडीच्या माध्यमातून भीमा नदीत शुक्रवारी दिवसभर शोध घेतला, मात्र बालक कुठेच मिळून आलेला नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दि.१८ रोजी रणजितकुमार साहू (मूळ रा. छत्तीसगढ) या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. मागील आठवड्यापासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, तो मिळून येत नाही.
गुरुवारी माण नदीपात्रात शोध घेतला. तेथेही तो मिळून न आल्याने शुक्रवारी उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर आदी ठिकाणी
भीमा नदीपात्रात दिवसभर होडीच्या माध्यमातून बोराळे बीटचे पोलिस हवालदार महेश कोळी, नवले, सोमनाथ माने, आदी कर्मचाऱ्यांनी भुई यांच्या माध्यमातून पाण्यात कसून शोध घेतला. मात्र, त्यास यश आले नाही.
डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज