टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील एका ढाब्याच्या पाठीमागे बसून बेकायदा दारू विक्री बोराळे करणाऱ्या अड्डयावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
छापा टाकून ७ हजार रुपये किमतीची दारू जप्त करून सलीम रमजान इनामदार (वय २८) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांच्या आदेशाने मंगळवेढा तालुक्यातील अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक
दि. २५ रोजी बोराळे नाक्यावर असताना खबऱ्यामार्फत त्यांना आंधळगाव येथील संगम ढाब्याच्या पाठीमागे वरील आरोपी हा देशी विदेशी दारूची चोरून विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच
सदर पथकाने सायंकाळ ५.२५ वा. छापा टाकला असता त्यावेळी १२६० ७ रॉयल स्टॅग, ३५२० रुपये किमतीच्या २२ मॅगडॉल नंबर १ च्या बाटल्या,
१६५० रुपये किमतीच्या ११ इंम्पिरिअल ब्यु कंपनीच्या बाटल्या, ७०० रुपये किमतीच्या १० देशी संत्रा दारू बॉटल अशा एकूण ७ हजार १३० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. याची फिर्याद पोलिस हवालदार प्रकाश काटकर यांनी दिली आहे.
दरम्यान, नुतन पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी अवैध धंदयावर कारवाई करण्याचे फर्मान काढले असून स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवेढयात त्यानुसार ही पहिली कारवाई केली आहे.
सध्या दारू उत्पादन शुल्क यांनीही कारवाईची मोहिम जिल्हयात सुरु केली असून धाब्यावर दारू पिणाऱ्याला मोठया प्रमाणात दंडही आकारले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज