टीम मंगळवेढा टाईम्स।
बदलापुरात शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसले. या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
तो 24 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे त्याचं 24 व्या वर्षी तीन लग्न झाले आहेत. तसेच त्याच्या तीनही पत्नी त्याच्या स्वभावाला कंटाळून सोडून गेल्या आहेत.
अक्षय शिंदे बदलापुरात ज्या परिसरात राहतो तिथल्या आजूबाजूच्या शेजारच्या नागरिकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवरुन प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अक्षय शिंदे याच्याविषयी माहिती दिली.
आरोपी अक्षय शिंदे याने तीन लग्न केली होती. यापैकी त्याचं तिसरं लग्न हे चार महिन्यांपूर्वीच झालं झालं होतं, अशी माहिती एका स्थानिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. आपण जिथे राहतो तिथे अक्षय शिंदे सारखा हैवान राहत होता या विचारानेच अनेकजण सुन्न झाले आहेत.
अक्षयचं चार महिन्यांपूर्वीच तिसरं लग्न झालं होतं. पण त्याची वागणूक आणि घरातील वादांना कंटाळून त्याची पत्नीदेखील त्याला सोडून गेली होती. यानंतर तो त्याची आणि भावासोबत राहत होता, अशी माहिती तिथल्या एका स्थानिकाने दिली.
अक्षयची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात दिसली नाही, असं स्थानिकाने सांगितलं. तर अक्षय हा गेल्या 5 वर्षांपासून त्या परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता, अशी माहिती स्थानिकाने दिली. अक्षय पाच वर्षांपूर्वी दुसऱ्या परिसरात राहत होता.
पण नगरपालिकेने त्याच्या घरावर अतिक्रमणाविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर तो इथे राहायला आला होता. विशेष म्हणजे आम्ही कुणी विचारही केला नव्हता की आमच्या परिसरात एक हैवान राहत होता, अशी प्रतिक्रिया अक्षयच्या शेजारी राहणाऱ्या एका स्थानिकाने दिली.
आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी संबंधित शाळेत जावून शाळेतील महिला सेवकांचा जबाब नोंदवला आहे.
तसेच पोलीस शाळेच्या शिक्षकांचादेखील जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. तसेच या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. पोलिसांनी एका तरुणीवर अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.
आरोपी अक्षयचं नेमकं गाव कोणतं?
अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म बदलापूरमध्ये झाल्याचा दावा केला जातोय. तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या कुटुंबासह राहत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली.
या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत. गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते. पण कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नव्हती.(स्रोत:TV9 Marathi)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज