मंगळवेढा टाईम्स न्युज।
दिवाळी सुटीत गावी आलेल्या व कोल्हापूर येथील डीवाय पाटील अभियांत्रिकीत महाविद्यालयात प्रथम वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या

जहीर शफी अहमद मुल्ला (२०) या विद्यार्थ्यांचा दुचाकी व अज्ञात वाहनाच्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची सोलापूर येथे नोंद झाली आहे.

पोलिसांकडून माहितीनुसार, जहीर शफी अहमद मुल्ला हा तरुण कोल्हापुरातील डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. त्याचे शालेय शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले होते.

दिवाळीत तो मंगळवेढा येथे गावी आला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास विवाह समारंभासाठी आत्याच्या मुलाला मरवडे रोडवरील शेतातून आणण्यासाठी दुचाकीने निघाला होता.

नकाते शॉपिंग सेंटरच्या समोर आला असता अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा हात तुटून बाजूला पडला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी सुरुवातीला मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात व नंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याला सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा दफनविधी काल सोमवारी दुपारी करण्यात आला, जहीर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. यामुळे मुल्ला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडील खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून गारगोटी येथे कार्यरत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











