mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण, राजकिय दबावापोटी सदरची कारवाई घरमालकाचा गंभीर आरोप; इतर अतिक्रमण काढण्याचे धाडस नगरपालिका करणार का?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 12, 2022
in मंगळवेढा
मंगळवेढ्यात पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण, राजकिय दबावापोटी सदरची कारवाई घरमालकाचा गंभीर आरोप; इतर अतिक्रमण काढण्याचे धाडस नगरपालिका करणार का?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गेली 12 वर्ष रेंगाळलेल्या मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौकातील अतिक्रमण सुटटीच्या दिवशी न्यायालयाच्या निकालानंतर नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काढून टाकले

दामाजी चौक ते मुरलीधर चौक या प्रमुख रस्त्यावरील “मास्टरप्लॅनच्या” नावाखाली अनेकांचे संसार उघड्यावर आणण्याचे काम केले होते. कोट्यवधी रुपयांच्या जागेची किंमत हजार-लाखात करून त्यांना बेदखल करण्यात आले होते.

मंगळवेढा नगरपलिकेने 18 मि.रुंदीचा मास्टरप्लन केल्यामुळे दामाजी चौक ते मुरलीधर चौक अशा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी 81 रहिवाशांना संपादीत करण्यासाठी 2004 साली मोजणी करण्यात आला.

त्यामधील 80 मिळकरदारांनी जागा खुली करुन देण्यात आली. मात्र एका मिळकतदाराने याबाबत पंढरपूर येथील न्यायालयात धाव घेतली.

त्या जागेत रस्ता पुरेशा आहे या कारणास्तव स्थगिती घेतली. कालांतराने ही स्थगीती उठवण्यात आली. शिवप्रेमी चौक ते मुरलीधर चौक हा मुख्य रस्ता असल्यामुळे हे अतिक्रमण वाहतुकीस अडथळा ठरत होते.

शिवप्रेमी चौकात रस्त्याच्या मुख्य तोंडावर 350 स्वे. फूटाचे अतिक्रमण असल्याने अरूंद रस्त्यामुळे शहरात जाणार्‍या वाहनांची कोंडी होत होती. मुख्य चौकात असलेल्या जागा मालकांने ती जागा नगरपलिकेकडे हस्तातर केली नव्हती.

दरम्यान 2019 साली योगेश डोरले व इतरांनी याबाबत जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाकडे त्यांच्या जागेसमोरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्याबाबत तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने या कार्यवाही न केल्यामुळे शेवटी हा प्रश्‍न न्यायालयात दाखल केला.

न्यायालयाने 6 एप्रिल 2022 रोजी निकाल देत नगरपलिकेला हे अतिक्रमण काढून रहिवाशासाठी रस्ता उपलब्ध करुन दयावा अशा आदेश दिला होता. परंतु, तरी देखील नगरपलिकेने पावसाळयाचे दिवस व दिवाळी सणाच्या निमित्ताने हे रहिवाश्याचे अतिक्रमण काढले नव्हते.

शेवटी सुट्टीच्या दिवशी आज नगरपलिकेने जेसीबी टॅक्टर व इतर वाहनाच्या बरोबरीने पोलीस बंदोबस्त घेत हे अतिक्रमण काढून टाकण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव, करनिरीक्षक विनायक साळुंखे, नगर अभियंता सुहास भिंगे, स्वच्छता निरिक्षक शिवम माने, बांधकाम अभियंता सुर्यवंशी,

स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी असे 20 जणांचे पथक दिवसभर ठाण मांडून होते. या पाडकामा दरम्यान बघ्यांनी गर्दी केली. शिवप्रेमी चौकात आता बांधकाम काढून टाकल्यामुळे रस्ता खुला झाल्यामुळे वाहनधारकाबरोबर या मार्गावरुन जाणा येणाऱ्याची गैरसोय दुर होणार आहे.

दरम्यान, मंगळवेढा शहरातील पंचायत समितीच्या समोर, शेजारी, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक व इतर ठिकाणी असलेली बेकायदेशीर अतिक्रमणे करण्याचे धाडस नगरपालिका करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

राजकिय दबावापोटी सदरची कारवाई

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही नगरसेवकांच्या राजकिय दबावापोटी सदरची कारवाई केली. अतिक्रमण पाडल्यानंतर पाठीमागील मिळकतदारांना त्याचा फायदा होणार असल्याने आर्थिक हितसंबंधातून हे बांधकाम पाडले. सदरची कारवाई सुट्टीच्या दिवशी न्यायालयात जाता येवू नये हा हेतू ठेवून केली. पाडकामामुळे आमच्यावर आन्याय झाला आहे.या कारवाईविरूध्द न्यायालयात दाद मागणार आहे. – अ‍ॅड. सागर टाकणे, मंगळवेढा

अतिक्रमणाला राजकीय आश्रय

नगरपलिकेने या अतिक्रमणाला राजकीय आश्रय दिल्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपलिकेने 13 वर्षे लावली. मी न्यायालयातून दोन वर्षात निकाल घेतला.

पण या पाडकामासाठी न्यायालयीन खर्च पालिकेने करणे अपेक्षित होते मात्र शहरविकासासाठी मला खिशातून न्यायालयीन खर्च करावा लागला. – योगेश डोरले, याचिकाकर्ते

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा अतिक्रमण

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
Next Post
कसं काय पाटील बरं हाय का..? काल काय ऐकलेलं ते खरं हाय का..? राष्ट्रवादीच्या दोन पाटलांमध्ये तापले शीतयुध्द; व्हिडीओ बघा…

कसं काय पाटील बरं हाय का..? काल काय ऐकलेलं ते खरं हाय का..? राष्ट्रवादीच्या दोन पाटलांमध्ये तापले शीतयुध्द; व्हिडीओ बघा...

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..