मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहर व परिसरात होवू घातलेली अतिक्रमण मोहिम जनभावनेचा विचार करून थांबवावी अशा सूचना आ.समाधान आवताडे यांनी प्रांताधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी, संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या.
मंगळवेढा शहर व परिसरात कोरोना महामारीमुळे मोठया प्रमाणात छोटया मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून आत्ता कुठे बाजार पेठ पूर्व पदावर येत असताना लांबलेला पाऊस यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून
येणारा राखी पौर्णिमा, श्रावणमास, श्रावण पोळा, गणेशोत्सव व नवरात्र महोत्सव हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे सण असताना अतिक्रमण मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे समजते.
परंतू एकंदरीत मंगळवेढा शहर व परिसरात असणाऱ्या व्यापारी व जनभावनेचा विचार करून ही अतिक्रमण मोहिम राबवू नये.
परंतू कोणत्याही छोटया मोठया व्यवसायिकांना त्रासदायक ठरणारी अतिक्रमण मोहिम राबवू नये अशा प्रकारच्या सूचना आ. समाधान आवताडे यांनी संबंधित प्रशासनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
३२६ अतिक्रमणे काढण्याची प्रशासनाची तयारी
मंगळवेढा शहरातील पंढरपूर रोड, बोराळे नाका व शहरातील ३२६ अतिक्रमणे काढण्याच्या दृष्टीने नगरपालिका व पोलिसांनी तयारी केली असून, दुष्काळाबरोबर ऐन सणासुदीच्या काळात या मोहिमेने खळबळ उडाली आहे. अतिक्रमणे काढताना व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यात खडाजंगी होऊन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील प्रमुख व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्यामुळे या दुकानांत खरेदीसाठी आलेल्या अनेक वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी रस्त्यावर थांबणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला.
यावेळी काही वाहनधारकांनी दुकानांसमोर पार्किंग सुविधा नसल्यामुळे आमची वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. वाहनांसाठी पार्किंग नसल्याने आमच्यावर दंड आकारणीचे कारणच नाही, अशी तक्रार केली.
याशिवाय दामाजी चौक येथे छोट्या व्यावसायिकांमुळे बस स्थानकातून बाहेर पडताना वाहतूक कोंडी होऊ लागली. याशिवाय शालेय परिसरात या छोट्या हातगाड्यांमुळे वाहतूक रस्त्यांवर कोंडी होऊन अपघाताची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे नागरिकांनी या व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्याबाबत तक्रारी केल्या.
नवीन पोलिस अधिकारी असल्यामुळे या तक्रारींची दखल घेतली जाऊ लागली. तक्रारींचा ओघ वाढला. सध्या दुष्काळी परिस्थितीत आणि सणासुदीच्या काळात दुकानदारांना या अतिक्रमण मोहिमेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यात व्यक्त केली जात आहे. योग्य समन्वय साधण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. अतिक्रमण काढण्यासाठी सहा प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांबरोबर नगरपालिकेचे २५ कर्मचारी, एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, सफाई कर्मचारी तैनात केले आहेत. स्वतःहून अतिक्रमणे काढून याबाबत यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत. – माळी, प्रभारी मुख्याधिकारी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज