टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा आगारातील एस.टी.कर्मचार्यांचा एस.टी.महामंडळाचे विलगीकरण शासकीय सेवेत करावे या मागणीवर ठाम असल्याने
गेले महिनाभर सुरु असलेला संप अदयापही कायम असून 210 चालक वाहकापैकी 15 कर्मचार्यांना आत्तापर्यंत निलंबीत करण्यात आल्याचे एस.टी.च्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान,मागील तीन दिवसापासून केवळ मंगळवेढा-पंढरपूर या मार्गावर दोन कर्मचार्याकरवी एस.टी.बस सेवा सुरु आहे.
मंगळवेढा आगारात जवळपास 210 चालक वाहक कर्मचार्यांची संख्या असून 29 ऑक्टोबरपासून या कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
शासनाने पगार वाढीची मागणी मान्य केली असतानाही कर्मचार्यांनी एस.टी.महामंडळाचे शासकीय सेवेत परिवर्तन करावे या मागणीसाठी अदयापही संप सुरुच ठेवला आहे.
परिणामी परिवहन मंत्र्यांनी कामावर येण्याचे वेळोवेळी आवाहन करूनही कर्मचार्यांनी न जुमानता आपल्या न्याय हक्कासाठी संपाचे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्धार घेतल्याचे कर्मचार्यांकडून सांगण्यात आले.
यापुर्वी सहा कर्मचारी निलंबीत करण्यात आले होते. मागील दोन दिवसापुर्वी पुन्हा नव्याने 9 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत.
कामावर 210 कर्मचार्यापैकी 32 कर्मचारी कामावर आले असल्याचा दावा एस.टी.च्या सुत्रांनी केला आहे. तर कर्मचारी वर्गांकडून केवळ 2 च कर्मचारी कामावर असल्याचे सांगितले जात आहे.
दोन कर्मचार्यामार्फत मागील तीन दिवसापासून पंढरपूर मार्गावर एस.टी.बस वाहतूक सुुरू असून प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज