टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसेनेचे जेष्ठ नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुमारे 40 आमदार घेऊन सूरत त्यानंतर गुवाहाटी घातली आहे.
राज्यातील ठाकरे सरकार अडचणीत आलेले आहे. यामुळे विठ्ठल व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांचे सर्व लक्ष राज्याकडे लागले आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत आपले पॅनल बिझी झाल्या नंतर आपले सरकार आपल्याला मदत करेल या भावनेने महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अधिक वेगाने प्रयत्न करत होते.
दरम्यान उद्धव ठाकरे यांचे सरकार आता टिकणार की पडणार अशी चर्चा सुरू झाल्यामुळे परत एकदा विठ्ठल व दामाजीला राज्य शासनाकडून मदत मिळेल की नाही याबद्दल पंढरपूर-मंगळवेढा दोन्ही तालुक्यात चर्चा होत आहे.
दरम्यान, विठ्ठल कारखान्याला राज्य शासनाची मदत झाल्याशिवाय कारखाना सुरू होणे अवघड आहे, जर महाविकास आघाडीचे सरकार गेले तर विठ्ठल कारखाना सुरू होण्यासाठी विठ्ठल च्या भावी संचालक मंडळाला भाजपाकडे जाण्याची वेळ येणार आहे.
आणि मंगळवेढामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले तर दामाजी कारखाना सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीचे संचालक मंडळ निवडून येणे गरजेचे आहे.
अन्यथा भाजपचे संचालक मंडळ निवडून आले तर महाविकास आघाडी सरकार मदत करणार नाही अशा दोन्ही बाजूने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात चर्चा होत आहे.
राज्यातील राजकीय हालचालीमुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ देखील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सध्या या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून समाधान अवताडे काम करत आहेत. भाजप शिवसेनेची युती होऊन नवीन सरकार आले तर पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला राजकीय लाभ मिळणार आहे.
व लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे. प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नांना मदत मिळणार आहे.
३५ गाव पाणी योजनेला निधी मिळणची अधिक शक्यता आहे, महाविकास आघाडीचे सत्ता कायम राहिली तर विठ्ठल कारखान्याला भगीरथ भालके यांना महाविकास आघाडीचा ला मिळू शकतो पर्यायाने विठ्ठल कारखाना सुरू होऊन पंढरपूर येथील ऊस उत्पादकांना न्याय मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज