टीम मंगळवेढा टाईम्स।
विधान परिषद निकालानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून नॉट रिचेबल आहे.
दरम्यान त्यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.
नुकतंच एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. #योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…असे त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस चव्ह्याट्यावर आली आहे.
भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपा १२३ मतं मिळाली होती.
मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे
एकनाथ शिंदेंसह सेनेचे 17 आमदार बंडाच्या तयारीत
विधान परिषदेच्या निकालाचा परिणाम राज्याच्या राजकारणात होत आहे. त्याचा पहिला दणका शिवसेनेला बसला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे 17 आमदारांसह सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये असल्याची चर्चा आहे.
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील , महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, संजय राठोड, श्रीनीवास वनगा,
संजय गायकवाड, संजय रायमूलकर हे आमदार नाराज असून त्यांनी शिंदे यांची साथ देण्याचे ठरविल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री अब्दुल अत्तार असल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषद निकालात शिवसेनेची तेरा मते फुटली होती. सेनेचे दोन्ही उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे काठावर जिंकून आले होते.
निकालानंतरच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते, तसेच वर उल्लेख केलेल्या आमदारांचाही संपर्क होत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
ठाकरे सरकारवर मोठे संकट आले आहे. शिंदे हे आज दुपार नंतर गुजरातमध्येच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.(स्रोत;सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज