टीम मंगळवेढा टाईम्स ।
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं.
दरम्यान, या निलंबित खासदारांना आता संसदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सचिवालयाने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.
निलंबनासोबत संसदेत प्रवेशबंदी करण्यात आल्याने खासदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तेरावा दिवस आहे.
अधिवेशन संपण्यासाठी काहीच दिवस बाकी असताना सत्ताधारी पक्षांच्या अनेक खासदारांच्या केलेल्या निलंबनामुळे हे अधिवेशन चांगलं चर्चेत आलं आहे.
आज विरोधी पक्ष संसदेतून केलेल्या १४१ खासदारांचे निलंबनावरून आक्रमक राहणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष हा उपराष्ट्रपती यांच्याबद्दल केलेल्या विरोधी पक्षातील खासदारांच्या कृत्यामुळे आक्रमक होण्याची शक्यता आहे.
खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभागृहाच्या बाहेर उपराष्ट्रपती जयदीप धनगड यांची केलेली नक्कल यावरून सत्ताधारी पक्ष कालपासूनच टीकेची झोड उठवत आहे. तोच धागा पकडत आज देखील सत्ताधारी पक्ष आक्रमक राहणार असल्याचं कळतंय.
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता पाहता, लोकसभा सचिवालयाने निलंबित खासदारांसाठी परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात संसद भवन, लॉबी आणि गॅलरीमध्ये येण्यापासून निलंबित खासदारांना बंदी घालण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज