टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर १८००२७०३६०० वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार आहे.
त्यामुळे गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. असे मत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा तालुक्यासाठी ग्रामीण पोलिस , जिल्हा परिषदेच्या वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली. ८२ गावचे पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२७०३६०० वरील प्रात्यक्षिकात सहभाग नोंदविला.
यावेळी डिवायएसपी राजश्री पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, केले पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे उपस्थित होते.
गोर्डे यानी उपस्थित सुमारे ४०० लोकांना मार्गदर्शन केले ब्रम्हपुरीचे सरपंच मनोज पुजारी म्हणाले, गोरडे अत्यंत प्रभावीपणे सदर यंत्रणेची उपयुक्तता व समाजातील सुरक्षेचे महत्त्व त्याविषयी सुंदर मार्गदर्शन केले.
इतर माध्यमांपेक्षा कार्यशाळेचे माध्यम प्रभावी असल्याचे याप्रसंगी जाणवले. थेट जनतेत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले.
गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे आग, दरोडा याविषयी प्रात्यक्षिकदाखवले. सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. संयोजन व सूत्रसंचालन सहाय्यक पोलिस निरीक्षक बापू पिंगळे, आभार सहा.पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विजय वाघमारे, प्रणोती यादव, सौरव शेटे, पो.कॉ.कृष्णा जाधव, दिगंबर गेजगे, अंकुश नलवडे व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज