mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! मंगळवेढ्यात पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या तु तु मै मै च्या नादात जाताहेत अनेकांचे बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 8, 2022
in मंगळवेढा
संतापजनक! मंगळवेढ्यात पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या तु तु मै मै च्या नादात जाताहेत अनेकांचे बळी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा शहरातून भरधाव वेगाने जाणार्‍या लक्झरी बसने पायी चालत जाणार्‍या 34 वर्षीय तरूणास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी लक्झरी चालक प्रल्हाद रामपाल चौधरी (वय 47 रा.राजस्थान) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून रेवणसिध्द शिवाजी मोटे (रा.नंदेश्‍वर) असे अपघातात मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

दरम्यान, मंगळवेढा शहरातून अवजड  वाहतूक बंद करण्याची मागील दोन वर्षापासून ज्येष्ठ नागरिक व  शहरवासीयांची मागणी असताना नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासन एकमेकावर ढकलून अपघातांना आमंत्रण देत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया आज दिवसभर नागरिकांमधून उमटत होती.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत रेवणसिध्द मोटे हा सकाळी 9.00 वा. नंदेश्‍वर येथून मंगळवेढयात काम असल्याने तो आला होता.तो जुन्या पोलिस चौकीजवळील राजयोग हॉटेलसमोरून दामाजी पुतळयाकडे पायी चालत जात असताना

पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या  आर.जे.27,पी.सी.1003 या क्रमांकाच्या ट्रॅव्हर्ल्सने जोराची धडक दिल्याने सदर तरूण हा रस्त्यावर पडला व ट्रॅव्हर्ल्सचे चाक त्या तरूणाच्या डोक्यावरून गेल्याने डोके पुर्णपणे चेंदामेंदा होवून तो जागीच मयत झाला असल्याचे मयताचा भाऊ हरिदास मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, मंगळवेढा शहरातून विजापूर -पंढरपूर हा राष्ट्रीय सिमेंटचा महामार्ग गेल्याने अवजड वाहने सुसाट वेगाने जातात. परिणामी वारंवार अपघात होवून मृत्यूच्या आकडयात वाढ होत आहे.

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर मंगळवेढयातील पहिल्या भेटीप्रसंगी पत्रकारांनी शहरातून जाणारी अवजड वाहतूक बाह्य मार्गाने वळवून जाणारे जीव वाचवावेत अशी मागणी केली होती.

यावर सातपुते यांनी तत्कालीन पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांना तात्काळ अवजड वाहतूक बंद करण्याच्या सक्त सुचना देवूनही वरिष्ठांच्या आदेशाकडे गेली दोन वर्षे प्रभारी पोलिस अधिकार्‍यांनी आत्तापर्यंत गांभिर्याने न पाहिल्यामुळे अपघाताची मालिका सुरु आहे.

मागील गळीत हंगामात ऊसाच्या ट्रॅक्टरने शाळकरी मुलाचाही जीव घेतला होता. दामाजी चौकात एका टेंपोने हॉटेलमध्ये काम करणार्‍या एका युवकाला धडक दिल्याने तोही मयत झाला होता.

बोराळे नाक्यावर ट्रॅक्टरने महिला हॉस्पीटलमध्ये दवाखान्याला उपचारासाठी आलेला रुग्ण रस्ता ओलांडताना धडक दिल्याने तो जागीच मयत झाला.

नगरपालिका म्हणते हे काम पोलिस प्रशासनाचे. दोघांच्या तु तु मै मै च्या नादात अनेकांचे जीव नाहक बळी

एवढया लोकांचे जीव जावूनही पोलिस प्रशासन म्हणते हे काम नगरपालिकेचे, तर नगरपालिका म्हणते हे काम पोलिस प्रशासनाचे. दोघांच्या तु तु मै मै च्या नादात अनेकांचे जीव नाहक बळी जात आहेत. हे तितकेच खरे आहे.

आता तरी पोलिस प्रशासन व नगरपालिकेला शहाणपणा सुचेल का असा संतापजनक सवाल या अपघातानंतर दिवसभर शहरवासीयांमधून व्यक्त होत होता.

सध्या शाळा कॉलेज सुरु असल्याने दामाजी चौकात मुला मुलींची प्रचंड गर्दी असते. तसेच नजीकच बसस्थानक असल्यामुळे प्रवाशांची आत जाणे व बाहेर येण्यासाठी धावपळ सुरु असते.

त्यामुळे येथे दिवसभर गर्दीमुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. शहराच्या उत्तर बाजूस शासनाने लाखो रुपये खर्चून बाह्य वळण रस्ता तयार केला असताना त्या मार्गाने वाहने न जाता थेट शॉर्टकट मारत शहरातून भरधाव वेगाने जातात.

पंढरपूर रोडला पहाटे 4.00 ते 7.00 या दरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले फिरावयास जातात.यावेळीही सुसाट वेगाने जाणारी वाहने पाहून अक्षरशः जीव मुठीत धरून पायी चालत जावे लागत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपघात

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
Next Post
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! पोलिसांच्या गाडीला अपघात; 6 पोलीस जखमी झाल्याची माहिती

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..