mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मतदारसंघात रस्ते, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी नसल्यामुळे शेती करणे झाले अडचणीचे; राष्ट्रवादी शरद पवार गट करणार आंदोलन; राहुल शहा यांनी दिला इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2024
in मंगळवेढा, राजकारण
मतदारसंघात रस्ते, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी नसल्यामुळे शेती करणे झाले अडचणीचे; राष्ट्रवादी शरद पवार गट करणार आंदोलन; राहुल शहा यांनी दिला इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मंगळवेढा येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांच्या निवासस्थानी पार पडली.

यावेळी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर व महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले त्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानून निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

आता येणाऱ्या विधानसभे मध्ये पण असेच यश महविकास आघाडीला मिळावे म्हणून प्रयत्नाची पराकष्टा करण्याचे वचन दिले.

शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साधनांना रासायनिक खतांना मोठ्या प्रमाणात जीएसटी असल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण निर्माण होत आहे.बी बियाणे रासायनिक खतांचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.

तसेच बी बियाणे,रासायनिक खते कीटकनाशके व इतर शेती उपयोगी साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.

मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका असून देखील तालुक्यामध्ये अद्यापही चारा डेपो व चारा छावण्या सुरू करण्यात आल्या नाहीत. तसेच सरकारकडून कोणत्याही प्रकारचे दुष्काळी अनुदान मिळाले नाही.त्यानंतर दूध दराचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून वारंवार सांगण्यात येत आहे तरीही मंगळवेढ्यातील शेतकरी अद्यापही अनुदानापासून पिक विम्या पासून वंचित आहेत.

सत्ताधाऱ्यांनी विकासाचा नारा देत देशाला महाशक्तिशाली बनवण्याचं सांगितलं होतं पण मंगळवेढा मतदारसंघातील तालुक्यातील रस्ते पिण्याचे पाणी शेतीला पाणी नसल्यामुळे शेती करणे अडचणीचे झाले आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा पिक विमा मिळला नाही व काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले त्या पडझड झालेल्या घरांचे नुकसान भरपाई देखील अद्याप मिळाले नाही त्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

मंगळवेढा हा तालुका शरद पवार साहेबांच्या विचारांना मानणारा तालुका असल्याने या वेळी उमेदवार हा मंगळवेढा तालुक्यातून द्यावा त्यावेळी सर्व उपस्थितांकडून सर्वांशी चर्चा करून राहुल शहा यांनी दोन किंवा तीन संभाव्य उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे द्यावेत असे सर्वानुमते ठरले

राहुल शहा बोलताना म्हणाले की आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी जो उमेदवार देतील तो निवडून आणू.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट हा तालुक्यातील प्रत्येक गावात जनमानसात पोहोचवण्यासाठी व पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील, अंबादास बेंद्रे, यादव आवळेकर, दादा पवार, मुजफ्फर काझी, अण्णा राऊत,बजरंग ताड, किसन गवळी, सदाशिव माळी, उमाकांत चिंचकर, लक्ष्मण कट्टे, वैभव पाटील, जमीर इनामदार, संतोष रंदवे, बबन ढावरे, नवनाथ शिंदे, दादा भगरे, निमंगरे, मुलानी सर, पंडित गवळी, कटारे सर, महादेव माळी, नवनाथ यादव, बंडोपंत पाटील, महादेव जिरगे, जैनुद्दीन पटेल,

सागर गुरव, सचिन वडतिले, वैभव ठेंगील, शब्बीर रांगेकर, काका मोरे, अजय ढेकळे, नानासाहेब करपे, अनिल आदलिंगे, नागनाथ क्षीरसागर, सत्यवान लेंडवे, सैफ अली शेख, चेतन पाटील, राहुल चौगुले, नवनाथ बिराजदार, आकाश पाटील, समाधान यादव, विजय पवार, सुनील गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी शरद पवार गट

संबंधित बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

तिहेरी अपील प्रकरणामुळे राजकीय तापमान चांगलेच चढले; उमेदवारांमधील कायदेशीर संघर्षाने निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण; आजच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष

November 27, 2025
Next Post
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

धाडस! वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसाच्या वाहनास दिली जोराची धडक, कॉन्स्टेबल जखमी; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..