टीम मंगळवेढा टाईम्स ।
बेगमपूर येथील भीमा नदीवरील पुलावर छोटे मोठे असंख्य खड्डे पडले असून याकडे राष्ट्रीय महामार्ग अभियंत्याचे दुर्लक्ष असल्याने नागरिक व वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान,यापुर्वी खड्डयांची दुरुस्ती केली होती मात्र काठया लावल्या व वार्याने उडून गेल्या अशी या कामाची स्थिती झाल्याने पुन्हा या खड्डयांशी सामना वाहनचालकांना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
आक्टोबर महिन्यात भीमा नदीला महापूर आल्याने हा पूल तीन दिवस पाण्याखाली गेला होता. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या पृष्ठभागावरील सिमेंट आवरण निघाल्याने छोठे मोठे असंख्य खड्डे पडले होते.त्याचबरोबर पुलाचे संरक्षित लोखंडी बारही तुडून पडल्याने पुलाची अवस्था धोकादायक बनली होती.
दरम्यान चक्क एक महिला पुलावरून खाली पडून दुर्देवी तीचा मृत्यू झाला होता.राष्ट्रीय महामार्गाकडून या पडलेल्या खड्डयाची डागडुजी करण्यात आली. मात्र ती अत्यंत निकृष्ठ पध्दतीने केल्याने काठया लावल्या..व वार्याने उडून गेल्या अशी सद्यस्थिती या कामाची झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.
सध्या पुलावर असंख्य खड्डे पडलेले आहेत.राष्ट्रीय महामार्ग कामगारांनी सिमेंट व खडी ओतून खड्डे बुजविले मात्र ते जास्त काळ टिकू शकले नाहीत. सध्या ही खडी उखडून गेल्याने पुन्हा खड्डयाचे साम्राज्य माजले आहे.पुलावरून जाताना अक्षरशः टु व्हिलर व फोर व्हिलर चालकांना जीव मुठीत धरून पुल ओलांडावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया चालकांनी प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केल्या.
एवढे खड्डे पडूनही राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते हे गांधारीच्या भुमिकेतच असल्याने कामकाजाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान, या पुलालगत राष्ट्रीय महामार्गाचे रात्रंदिवस काम चालू असताना हे खड्डे त्यांच्या निदर्शनास कसे काय येत नाहीत असा संतापजनक सवालही वाहनचालकातून केला जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज