टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे पडक्या घरात लिंबाच्या झाडाखाली चालणार्या तिरट नावाच्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा मारून 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करून माजी सरपंचासह 8 जणांविरूध्द जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मी दहिवडी येथील गंगाधर मसरे यांच्या पडीक घराच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाखाली दि.4 रोजी 4.00 वा. यातील आरोपी आपय्या राचय्या स्वामी (वय 58),वसंत रामचंद्र कोष्टी(वय 58),शहाजी बापू सोनवले(वय 47),आण्णा जगन्नाथ बनसोडे(वय 35),
माजी सरपंच विलास मलकू पाटील(वय 67),अरूण गंगाधर स्वामी (वय 65),मुरलीधर रामचंद्र पाटील (वय 66),श्रीनिवास शिवाजी मदने(वय 28) हे सर्व आरोपी गोलाकार बसून बेकायदेशीररित्या तीन पानाचा तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले.
पोलिसांनी या घटनास्थळावरून 20 हजार रोख रक्कम तर जवळपास 10 हजार 800 रुपये किमतीचे 6 मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत.
याची फिर्याद पोलिस शिपाई गणेश सोलनकर यांनी दाखल केल्यानंतर वरील आठ आरोपीविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाबाबत कडक भुमिका घेतली असून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज