टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात एका 45 वर्षीय तरूणाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेवून
आत्महत्या केल्याची घटना घडली असून अखिल उस्मान काझी असे त्या तरूणाचे नाव आहे.दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.28 रोजी दुपारी 2.30 वा. अखिल उस्मान काझी याने शहरातील घुले गल्लीत अज्ञात कारणावरून त्याचे राहते घरात पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेवून
आत्महत्या केल्याची खबर गालिबपाशा काझी यांनी पोलिसात दिल्यावर या घटनेची नोंद नोंदविण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार निंबाळकर हे करीत आहेत.
मुलांच्या शिक्षणाच्या तणावातून सांगोल्यात पित्याची आत्महत्या
उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची आर्थिक अडचण येईल, या तणावातून पित्याने राहत्या घरातील पंख्याला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना गुरुवारी रात्री ८:३०च्या सुमारास सांगोल्यात विद्यानगर येथे घडली. हरिश्चंद्र सुभाष दौंडे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. याबाबत महेश दत्तात्रय बोत्रे (रा. त्रिमूर्ती टॉकीजसमोर, सांगोला) यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र हे एका बँकेत दिवसभर शिपाई म्हणून तर रात्री एका पंपावर वॉचमनची नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
मुलांचे शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट घेत होते. पत्नी मनीषा ही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करत होती. दोन्हीही मुले उच्च शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना पैशाची अडचण येईल म्हणन हरिश्चंद मागील १५ दिवसांपासून तणावाखाली होते, असे नातेवाइकांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी रात्री ८ वाजता पत्नी मनीषा या सांगोला कोष्टी गल्लीत माहेरी आल्या होत्या. हीच संधी साधून हरिश्चंद्र यांनी घरातील छताच्या पंख्याला सुताच्या दोरीने गळफास घेतला.
रात्री ९च्या सुमारास पत्नी मनीषा माहेरून घरी आली असता घराचा दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावले असता पतीने गळफास घेतल्याचे दिसले.
त्यांनी आरडाओरडा केला. नातेवाइकांनी त्यास खाली उतरून तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तपास पोलिस कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर करीत आहेत.
मुलगा एमबीबीएस तर मुलगी घेते लॉचे शिक्षण
मुलगा ज्ञानमूर्ती व मुलगी संजोत, असे मिळून विद्यानगरात राहतात. दरम्यान, त्यांचा मुलगा हरिश्चंद्र दौंड ज्ञानमूर्ती हा बारामती येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असून, मुलगी संजोत पुणे येथे एलएलबीचे उच्च शिक्षण घेत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज