टीम मंगळवेढा टाईम्स ।
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आपल्या प्रवाशांसाठी देश-विदेशात कमी किमतीत सतत नवनवीन आणि नाविन्यपूर्ण टूर पॅकेजेस सादर करत आहे. असंच एक खास पॅकेज आयआरसीटीसीने जाहीर केले आहे.
जर तुम्हाला दुबईत फिरण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दुबईत फिरण्याची अनेकांची इच्छा असते, पण बजेट नसल्याने हात आखुडता घ्यावा लागतो. असं असलं तरी अनेक पर्यटकांचं ड्रीम डेस्टिनेशन आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
मोठे मोठे शॉपिंग मॉल, स्वच्छ शहरं पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. तुम्हाला दुबईला जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण खिशाला परवडणारं पॅकेज इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केलं आहे.
यात पाच दिवस आणि चार रात्र असं पॅकेज आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, पुणे, चेन्नई आणि चंदीगडसह अनेक शहरांना हे पॅकेज लागू आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला मिरॅकल गार्डन, धो क्रूझ, बुर्ज-अल-खलिफा, शेख झायेद मशीद, BAPS हिंदू मंदिर आणि ग्लोबल व्हिलेजसह दुबई आणि अबू धाबीच्या प्रमुख आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकता.
मुंबईतून जाणाऱ्या प्रवाशांसाठी टूर 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान असेल आणि दिल्लीहून जाणाऱ्या प्रवाशांसाठी टूर पॅकेज 24 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत असेल. बंगळुरुहून 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2025 पर्यंत हे पॅकेज असणार आहे.
चेन्नई शहरातून टूर पॅकेज 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत उपलब्ध असेल तर चंदीगड ते दुबई ट्रिप पॅकेज फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल, अशी घोषणा आयआरसीटीसीने केली आहे.
तुम्हाला दुबईला जाण्याची इच्छा असेल तर दिल्ली ते दुबई पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 1.04 लाख ते 1.09 लाख रुपये आहे. मुंबईतून पॅकेजची सुरुवात 1.02 लाखांपासून होणार आहे. बंगळुरूहून या पॅकेजची सुरुवात 92 हजारांपासून सुरू होते आणि चेन्नईपासून दुबईपर्यंतच्या सहलीचा खर्च 91 हजारांपासून सुरू होतो.
Embark on the Ultimate Dubai & Abu Dhabi Adventure!
IRCTC's 5 Nights/6 Days Dazzling Dubai is here – an international flight tour package Ex. Delhi that lets you explore the iconic cities of Dubai and Abu Dhabi in one of the most affordable, all-inclusive packages!
From… pic.twitter.com/8SIqkWtvAt
— IRCTC (@IRCTCofficial) November 8, 2024
चंदीगडहून या पॅकेजची किंमत 1.2 लाखांपासून सुरू होते. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.irctctourism.com ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज