टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाऊसाहेब रूपनर यांच्या निवासस्थानी डॉ. ऋचा सूरज रूपनर यांनी दि. ६ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी सासरे भाऊसाहेब रूपनर व पती डॉ. सूरज यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभे केले.
यात पती डॉ. सूरज यांना दि. १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी तर सासरे भाऊसाहेब यांना दि. १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीप त्रकाद्वारे दिली.
सांगोल्यात डॉ. ऋचा यांनी दि. ६ जून रोजी गळफास घेतला. त्यांच्या भावाने सांगोला पोलिसात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी पती डॉ. सूरज, सासरे भाऊसाहेब, सासू सुरेखा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मंगळवारी पंढरपुरातील डॉक्टरांनी सांगोला पोलिस ठाण्यात ठिय्या मारल्यावर रात्री सासरे भाऊसाहेब यांना कोल्हापुरातून ताब्यात घेतले. पती डॉ.सूरजला मोबाइल लोकेशनवरून अनकढाळमध्ये ताब्यात घेतले.
सासू सुरेखा गायब, पोलिस शोधात
तिसऱ्या संशयित आरोपी सुरेखा रूपनर या गायब असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक त्यांचा शोध घेत आहोत, असे पोलिस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी सांगितले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज